आपल्या भारतात चहा प्रेमींची कमी नाही. उन्हाळा असो वा हिवाळा अर्ध्याहून अधिक लोकांना चहा हा लागतोच. अशावेळी कुल्लडचा चहा, वेलची चहा, मसाला चहा, नागोरी चहा असे चहाचे अनेक प्रकार आपल्याकडे असून, त्याचे चाहते देखील अनेक आहे.
शिवाय चहामध्ये इराणी चहाचा देखील समावेश आहे. या चहाचा स्वाद काही अनोखाच असतो, त्यामुळेच तर 'चहा प्यावा तर तो इराणीचा'असे म्हंटले जाते. आजही पर्शियन चहाचे चाहते काही कमी झालेले नाहीत. तुम्ही देखील इराणी चहाचे शौकीन आहात का? तर हा चहा घरी कसा बनवायचा याबद्दल माहिती घेऊया.
थंडीत अनेक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी चहाचे सेवन करतात. त्यामुळे या हंगामात प्रत्येक चहाच्या टपरीवर तुम्हाला चहा प्रेमींची गर्दी पाहायला मिळेल. शिवाय या चहाचे वेगवेगळे प्रकार देखील प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ इराणी चहा. आपल्यापैकी अनेक लोकं असतील यांना इराणी चहाचा आस्वाद घ्यायला आवडतो. तसेच हा चहा सामान्य चहाच्या टपरीवर भेटतो असे नाही, तसेच तो घरी देखील बनवता येईल असे देखील नाही. इराणी चहाचे हेच वैशिष्ट्य त्याला खास बनवते. पण आता, हा चहा तुम्ही घरी देखील बनवू शकता. कारण सेलीब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इराणी चहाची रेसिपी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर इराणी चहा बनवण्याची अप्रतिम रेसिपी शेअर केली आहे. त्याचे अनुसरण करून तुम्ही घरच्या घरी फक्कड इराणी चहा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास चहा बनवायचा असेल तर या रेसिपीचा विचार करण्यास हरकत नाही.
इराणी चहा बनविण्याची सोपी रेसिपी
इराणी चहा बनवायला खूप सोपा आहे, आणि त्याची चवही खूप अप्रतिम आहे. यासाठी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली इराणी चहा बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घेऊया.
साहित्य
2 कप पाणी
3 चमचे चहाची पाने
500 मिली दूध
2 ते 3 वेलची
2 चमचे कंडेन्स्ड दूध
3 चमचे साखर
इराणी चहा बनविण्याची कृती
यासाठी सर्व प्रथम एका पातेल्यात 2 कप पाणी टाकून गरम करा.आता गरम पाण्यात चहा पावडर टाकून त्यावर झाकण ठेवायचे आहे. पाण्यात चहा पावडर पूर्णपणे वाफवून घ्यायची आहे.दरम्यान, दुसऱ्या पॅनमध्ये 500 मिली दूध घाला आणि ते अर्धे होईपर्यंत शिजवा.दूध निम्मे झाल्यावर त्यात वेलची आणि कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले मिक्स करा.त्यानंतर चहाच्या पानाच्या पाण्यात साखर घालून पाणी पुन्हा उकळून घ्या.जेव्हा पाने आणि साखर पाण्यात चांगली विरघळते आणि तीव्र सुगंध येऊ लागतो, तेव्हा गॅस बंद करा.त्यानंतर हे चहाचे पाणी गाळणीने गाळून घ्या.गाळून घेतलेल्या या चहाच्या पाण्यात तयार गरम दूध घालून चमच्याने हलवा. आशाप्रकारे तुमचा इराणी चहा तयार आहे. तुम्हाला जर दुधाचा चहा प्यायचा नसेल तर तुम्ही ही स्टेप वगळू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.