Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 'या' महिला नेत्यांच्या नावाची चर्चा? रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 'या' महिला नेत्यांच्या नावाची चर्चा? रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
 

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतचं उत्तर गुलदस्त्यात आहे.

अनेक नावांची चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच महिला मुख्यमंत्री होण्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. या महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्ली महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं म्हंटल आहे. तर महिला मुख्यमंत्र्याच्या बाबतीत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्यात की,अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे. मात्र, या गोष्टी दोघांना माहीत असल्याने त्यांना भाजपचं ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे ठरलेलं आहे, पण पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे, बघुयात काय होतं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तर राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे. मंत्री पदासाठी या महिला आमदारांची नावे चर्चेत आहेत.
1) अदिती तटकरे
2) पंकजा मुंडे
3) मनीषा कायंदे
4) माधुरी मिसाळ
5) भावना गवळी
6) देवयानी फरांदे
7) श्वेता महाले
महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? 

महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू आहे. पहिली पसंती शिवाजी पार्कला देण्यात आली आहे, तर रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवनचेही पर्याय समोर आहेत.राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सभा झाली नव्हती, त्यामुळं शिवाजी पार्कवर सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळं तिथं शपथविधी करण्याची जादा शक्यता आहे. तसंच 6 डिसेंबरच्या तयारीत अडथळा नको म्हणून इतर ठिकाणांचाही विचार सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.