Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल


रायपूर : छत्तीसगढच्या मनेंद्रगढ पोलीस ठाणे हद्दीतील मौहारपारामध्ये चक्क तहसीलदार महोदयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल झाला असून अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर झालेल्या वादातूनही ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

येथील प्रशासन विभागाकडून अतिक्रमण हटविण्यात येत होते, तहसीलदार  यजवेंद्र कैवर्त आणि प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात ही अतिक्रमण मोहीम सुरू होती. यावेळी, नितीन अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तहसीलदार यजवेंद्र यांच्यासोबत वाद घालत त्यांना चक्क मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून  व्हायरल झाला आहे. शहरातील स्कूल भवन आणि नाल्याजवळ करण्यात आलेलं अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. त्यासाठी आमची टीम घटनास्थळी दाखल होऊन अतिक्रमण हटविण्याचं काम करत होती, त्यावेळी नितीन अग्रवाल यांनी माझ्यासोबत शिवीगाळ करत मला मारहाण केली. आमच्या पथकाने तेथील सामान हटविण्याचं काम करताना, अग्रवाल यांनी धमकी देत धक्काबुक्की केल्याचं तहसीलदार यजवेंद्र यांनी म्हटलं. 


पीडित नितीन अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, मी दुकानी नव्हतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची नोटीस न देता प्रशासनाने माझ्या दुकानातील सामानाची तोडफोड केली. जेसीबीच्या सहाय्याने सामानाची तोडफोड करुन माझं दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर, प्रत्यक्षदर्शी असलेल्या विवेक पांडे यांनीही यास दुजोरा दिला असून, प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. तसेच, नितीन यांनी काही वेळ मागितता होता. मात्र, पोलिसांनी नितीन यांना पोलीस गाडीत बसवलं अन् सामानाची तोडफोड केल्याचं पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिला. पण, या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मारहाण करणाऱ्या युवकावर संताप व्यक्त केला. मात्र, वस्तूस्थिती समजल्यानंतर प्रशासनाविरूद्धही रोष व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक उकसवण्याचा प्रयत्न केल्यानेच वादाला सुरुवात झाली, त्यातून नितीन यांनी मारहाण केली. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होती. नितीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य न केल्यानेच हे अतिक्रमण हटविण्यात आल्याचं तहसीलदार यजवेंद्र यांनी म्हटलं आहे. तर, आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.