Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी रात्री लावून ठेवा 'हे' एक तेल, पुन्हा दिसाल तरूण!

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी रात्री लावून ठेवा 'हे' एक तेल, पुन्हा दिसाल तरूण!
 

महिला असो वा पुरूष कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सुरू होतं. वय वाढण्यासोबतच, त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. ज्यामुळे कमी वयातच तुम्ही म्हातारे दिसू लागता.

अशात केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो. ज्यांचे साइड इफेक्ट्स भरपूर असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या काही एकाएकी गायब होणार नाहीत. मात्र, काही योग्य उपाय योग्य पद्धतीने केले तर सुरकुत्या दूर करता येतात. खोबऱ्याचं तेल यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशात खोबऱ्याचा तेलाचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

खोबऱ्याच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-एजिंग गुण असतात. त्यामुळे हे तेल लावल्याने त्वचेला हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. अशात त्वचा तरूण दिसण्यास मदत मिळते. या तेलात असलेल्या लॉरिक अ‍ॅसिडने त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि त्वचेतील सेल्स रिपेअरही होतात. व्हिटॅमिन ई भरपूर असल्याकारणाने खोबऱ्याच्या तेलाने त्वचा मुलायम होते आणि यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स वेळेआधीच येणाऱ्या सुरकुत्या दूर करतात.

कसा कराल वापर?

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल असंच चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी आधी चेहरा पाण्याने धुवून घ्या, हातावर तेल घ्या आणि चेहऱ्यावर सर्कलर मोशनमध्ये लावा. जर त्वचा ड्राय असेल तर खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवा. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी तेल लावल्यावर अर्धा ठेवून नंतर चेहरा धुवून घ्यावा.

एरंडीच्या तेलासोबत

खोबऱ्याच्या तेलात थोडं एरंडीचं तेल मिक्स करूनही वापरू शकता. सुरकुत्या कमी करण्यासाठी एरंडीचं तेल खूप प्रभावी मानलं जातं. २ ते ३ थेंब एरंडीचं तेल घ्या आणि अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल मिक्स करा. हे तेल नंतर चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवून घ्याल.

खोबऱ्याचं तेल आणि हळद

सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हळद आणि खोबऱ्याचं तेलही चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी अर्धा चमचा खोबऱ्याच्या तेलात २ चिमुटभर हळद टाका आणि मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याने त्वचेला हायड्रेशन मिळतं, अ‍ॅंटी-एजिंग गुण मिळतात, त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा चमकदारही दिसते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.