Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी! तब्बल ६९० पदांसाठी भरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी! तब्बल ६९० पदांसाठी भरती सुरु
 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. तब्बल ६९० पदांसाठी ही भरती निघाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून नंतर अर्ज करावेत.


ही पदे भरली जाणार?
 
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250 पदे
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130 पदे
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233 पदे
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77 पदे
 
शैक्षणिक पात्रता:
 
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

या भरतीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
 
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 41,800/- ते 1,32,300/-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) - 41,800/- ते 1,32,300/-
दुय्यम अभियंता (स्थापत्य) - 44,900/- ते 1,42,400/-
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) -44,900/- ते 1,42,400/-

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.