Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपला हरवण्यासाठी नाभिक समाज जयश्री पाटील यांच्या पाठीशी नाभिक समाजाचा श्रीमती जयश्री पाटलांना पाठिबां

भाजपला हरवण्यासाठी नाभिक समाज जयश्री पाटील यांच्या पाठीशी नाभिक समाजाचा श्रीमती जयश्री पाटलांना पाठिबां 


सांगली, ता.९: सांगली जिल्हा नाभिक एकता फाउंडेशन, संत सेना महाराज सलून असोसिएशन सांगली शहर, संत सेना महाराज सेवा संघ यांचा सांगली विधानसभा मतदारसंघाच्या महिला अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री मदन पाटील यांना पाठिंबा दिला.

जिल्हा नाभिक एकता फाउंडेशन, संत सेना महाराज सलून असोसिएशन सांगली शहर, संत सेना महाराज सेवा संघच्या पदाधिकाऱ्यांनी आज जयश्री पाटील यांची भेट घेतली. सांगली विधानसभा मतदारसंघात नाभिक समाजाचे एकूण अंदाजे साधारणता 15 हजार मतदान आहे. 
        
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना नाभिक समाजाने लोकसभा निवडणुकी वेळी जाहीर पाठिंबा दिला होता. संपूर्ण जिल्ह्यात नाभिक समाजाची एकूण 52 हजार मतदानाची यादी विशाल दादा यांच्याकडे दिली होती. सध्या जयश्री पाटील महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत त्यांच्या पाठीशी खासदार विशाल दादा पाटील उभे आहेत. जयश्री पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी नाभिक समाज एकवटला आहे.
      
जिल्ह्यात नाभिक समाजाची फार मोठी ताकद आहे, सांगली जिल्ह्याचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या नेत्यांना घरी बसवण्याचे काम नाभिक समाजाने केले आहे. नाभिक समाज ज्या उमेदवाराच्या मागे उभा राहतो तो उमेदवार नक्की निवडून येतो. भाजपला हरवण्यासाठी आमचा नाभिक समाज जयश्री पाटलांच्या मागे उभे आहे. असे मत  जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, सेवा संघ अध्यक्ष अरुण साळुंखे यांनी बोलताना व्यक्त केले.
 
 यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, सेवा संघ अध्यक्ष अरुण साळुंखे, मिरज माजी जिल्हाध्यक्ष अनिल काशीद, प्रमोद शिरसागर, संजू सपकाळ, संघ असोसिएशन अध्यक्ष संतोष खंडागळे, जिल्हा युवा अध्यक्ष शाम जाधव, ज्योतीराम चव्हाण, दिलीप खंडागळे, आनंद जाधव,विजय बनकर, सचिन खंडागळे यासह सलून असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.