अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा
नाशिक अनैतिक संबधाला अडथळा ठरत असलेल्या भावाचा सख्या मावसभावाने काटा काढण्याकरीता भावाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी फाडा परिसरातील कचरा डेपो परिसरात उघडकीस आला. डोक्यात काहीतरी वस्तूने वार करत खुन केल्याचे प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार संशयित फरार आहेत.आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील कचरा डेपो च्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह अाढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पथकाने घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.
मयताच्या खिशातून अधारकार्ड मिळून आले. त्या अधारे मयताची ओळख पटवण्यात आली. योगेश सुभाष बत्तासे वय ३१ रा. पिंपरखेड असे नाव निष्पन्न झाले. मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला कुटुंबियांना ओळख पटवली. त्याच्या चौकशीत मयताच्या पत्नीचे त्याच्या मावस भावासोबत अनैतिक संबध असल्याची माहिती मिळाली. मयताला अनैतिक संबधाची भनक लागल्याने पती पत्नी मध्ये वाद सुरु असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित मावसभावाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.