महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक अगदी अनपेक्षितरित्या पार पडली. भरघोस मतं मिळवत महायुतीने पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केलं. महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या असून त्यापैकी अर्ध्या म्हणजे 132 जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता तर महायुतीची येणार आहे मात्र आता तीनही घटक पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच दिसून येणार आहे.
मुख्यमंत्रीपदापासून सुरू होणारी रस्सीखेच ही कोणत्या पक्षाला जास्त मंत्रिपदं मिळणार यावर येऊन ठेपणार आहे. अशातच मंत्रीपदाची संभाव्य यादी समोर आली आहे. महायुती अंतर्गत मंत्रीपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कुणाची नावं चर्चेत आहेत आणि कोण मंत्री होऊ शकतं
जाणून घेऊया.
किती जण मंत्री होणार ?
विधानसभेचं संख्याबळ 288 आहे. त्यापैकी 15 टक्के संख्येला मंत्रिपद देता येतं. यानुसार राज्यात महायुतीचे एकूण 43 मंत्री होऊ शकतात. ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. त्यानुसारच महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल. ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे जास्त मंत्री याच पद्धतीने मंत्रिपदं दिली जातील.
• भाजपचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
1. देवेंद्र फडणवीस
2. चंद्रशेखर बावनकुळे
3. सुधीर मुनगंटीवार
4. चंद्रकांत पाटील
5. प्रविण दरेकर
6. आशिष शेलार
7. गिरीश महाजन
8. मंगलप्रभात लोढा
9. राहुल कुल
10. रवींद्र चव्हाण
11. गणेश नाईक
12. संभाजी पाटील निलंगेकर
• भाजपचे संभाव्य राज्यमंत्री
1. नितेश राणे2. माधुरी मिसाळ3. शिवेंद्रराजे भोसले4. प्रसाद लाड5. राणा जगजितसिंह पाटील6. गोपीचंद पडळकर7. संजय कुटे
• शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
1. एकनाथ शिंदे
2. शंभूराज देसाई
3. उदय सामंत
4. दादा भुसे
5. संजय राठोड
6. भरत गोगावले
7. गुलाबराव पाटील
• शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
1. संजय शिरसाट2. विजय शिवतारे3. प्रताप सरनाईक4. राजेंद्र यड्रावकर
• राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
1. अजित पवार
2. छगन भुजबळ
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. दिलीप वळसे-पाटील
6. आदिती तटकरे
7. धर्मरावबाबा अत्राम
• राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री
1. संग्राम जगताप2. संजय बनसोडे3. सुनील शेळके4. इंद्रनील नाईक5. मकरंद पाटील6. माणिकराव कोकाटे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.