सांगली विधानसभा मतदार संघाचे अपक्ष महिला उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात बामणोली येथे गावातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या उपस्थितीत पार पडला . या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना जयश्री मदन पाटील म्हणाल्या की भाऊंच्या पश्चात कार्यकर्त्यांची हेळसांड होऊ नये म्हणुन ही निवडणुक हाती घेतली आहे . महायुती सरकारच्या काळात महिलांच्यावर होणारे अत्याचाराविरुद्ध मी ही निवडणुक हाती घेतली आहे. महिलांना संरक्षण व त्याच्या समस्या जाणुन घेऊन त्या लवकरात लवकर सोडवु अशी ग्वाही जयश्री पाटील यांनी दिली. बामणोली, दत्तनगर, कापसे प्लाॅट , महसुल काॅलनी वारणाली, लक्ष्मीनगर गोसावी गल्ली आदी परिसरात भेटी देताना युवक युवती, महिला, नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विशालदादा युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत उर्फ बंडू पाटील , नगरसेविका शुभांगी साळुंखे, डी एम गोसावी, सागर डुबल, संजय पाटील, प्रकाश मालदर, प्रताप गोसावी, अमित भोसले, सुनिल यमगर, निखील गोसावी, याच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.