Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काय झाडी, काय डोंगुर अन् काय तो पराभव! शहाजीबापू पाटील यांचा दारुण पराभव !

काय झाडी, काय डोंगुर अन् काय तो पराभव! शहाजीबापू पाटील यांचा दारुण पराभव !

एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यांना शेकापाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केला आहे.

हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख हे 11 वेळा या मतदारसंघातून आमदार होते. खुद्द शहाजीबापुंनी देशमुखांविरोधात सहावेळा निवडणूक लढविली होती.

2019 ला देशमुखांनी वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शहाजीबापू पाटलांना संधी चालून आली होती. 2019 ला शहाजीबापूंचा विजय झाला होता. आता बाबासाहेब देशमुखांनी पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

या स्स्त्यांवर सांगोला विधानसभा शिंदे :

बाबासाहेब देशमुख - १,१६,२८० 

शहाजीबापू पाटील - ०,९०,८९६ 

दीपकआबा साळुंखे - ०,५१,००० 

शेकापचे - डॉ. बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.

जातीय समीकरणांचे महत्त्व

सांगोल्यातील 40% मराठा समाजाचे मतदान निर्णायक मानले जाते, तर उर्वरित 60% मतांमध्ये धनगर समाज सर्वाधिक आहे. लोणारी, दलित, मुस्लिम, आणि लिंगायत समाजाचे देखील महत्त्वाचे योगदान असते. पारंपारिकपणे मराठा समाजाचे मतदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांनी अनेकदा विजयी घोडदौड केली.

इतिहासातील संघर्ष आणि निवडणूक परिणाम

सांगोला मतदारसंघात सुरुवातीपासूनच धनगर आणि मराठा समाजातील लढत दिसून येते. काँग्रेसच्या 1952 आणि 1957 च्या निवडणुकांत धनगर समाजाचे केशवराव राऊत यांनी विजय मिळवला, तर 1962 मध्ये शेकापचे गणपतराव देशमुख यांनी विजयी होऊन सांगोल्यात आपली मजबूत पकड ठेवली. 1972 च्या निवडणुकीत साळुंके यांनी देशमुख यांना पराभूत केले. मात्र, त्यानंतर 1974 मध्ये देशमुख यांनी पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळवून विधानसभेत पुनरागमन केले. यानंतर 1980 ते 1990 या सलग चार निवडणुकांत देशमुख यांनी विजय मिळवला. 

1995 मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील केवळ 192 मतांनी विजयी झाले, तर पुढील निवडणुकांमध्ये देशमुख यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. 2019 मध्ये देशमुखांच्या अनुपस्थितीत शहाजीबापूंनी शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला. तर या निवडणुकीत पुन्हा शहाजीबापू यांचा पराभव झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.