Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग यांचा सुधीर दादा गाडगीळ यांना जाहीर पाठिंबा : सुधीर सिंहासने

मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग यांचा सुधीर दादा गाडगीळ यांना जाहीर पाठिंबा : सुधीर सिंहासने 


सांगली:  सांगली येथे लिंगायत बोर्डिंग मध्ये बैठक पार पडली यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ भाजप प्रदेश अध्यक्ष शेखर इनामदार उपस्थित होते. श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग, सांगली यांनी आयोजित केलेल्या बैठकीस सुधीर दादा गाडगीळ उपस्थित होते.

यावेळी सुधीर दादा गाडगीळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच लिंगायत समाजाचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी सुधीर दादा गाडगीळ यांचा सत्कार अध्यक्ष सुधीर सिंहासने यांच्या हस्ते शाल पुष्पहार तसेच श्री मोरगाव राजेंद्र वीरशैव यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला, तसेच भाजपा नेते शेखर इनामदार यांचाही सत्कार करण्यात आला.
सुधीर सिंहासने म्हणाले की आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची ओळख स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक नेता अशी आहे आणि विरोधक यांच्यावर टीका करतात त्यामुळे विरोधकांच्या बालिश बुद्धीची कीव येते गेल्या दहा वर्षात सुधीर दादांनी सांगलीमध्ये विकास कामांचा डोंगर उभा केला आहे म्हणून यावेळी सुद्धा सुधीर दादा यांना लिंगायत समाजाचे शंभर टक्के मतदान होणार आहे आणि श्री दादा यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहोत असे आश्वासन दिले.

सुधीर दादा यांच्या कामांची ओळख म्हणजे सुधीर दादा जवळ कोणीही कुठल्याही समाजाचा माणूस काम घेऊन जाऊ दे दादा एका मिनिटात त्याचे काम सोडतात ही दादांच्या कामाची ओळख आहे. यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने कार्यसम्राट ही पदवी मिळवलेले आपले लाडके आमदार म्हणजे सुधीर दादा गाडगीळ. गेल्या दहा वर्षांमध्ये म्हणजे 2014 साली सत्तांतर झाल्यापासून सांगलीसाठी हजारो कोटींचा  मोठा निधी आणणेही फार मोठी अचीवमेंट आहे. तसेच सांगलीतील सांगली ते पेठ रस्ता, कोल्हापूर ते अंकली रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, घनकचरा व्यवस्था महापालिकेला अनुदान मिळवणे मिळवून देणे ही प्रचंड कामे 2014 च्या अगोदर कधीही झाली नव्हती ती दादांनी साक्षात पूर्ण केलेली आहेत आणि विकास कामांचा प्रचंड डोंगर आहे.
तसेच शासनाच्या योजना उज्वला गॅस योजना मोफत राशन तसेच लाडकी बहीण एसटीची महिलांसाठी अर्धी तिकिट योजना, मुलींना मोफत शिक्षण या सर्व योजना नारीशक्तीला मजबूत करण्यासाठी आहेत. कोरोना काळात आपला देश थांबला होता तेव्हा आपल्या देशातील एक कणखर नेतृत्व म्हणजेच आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला तसेच संपूर्ण जगाला उपलब्ध होईल अशी कोरोनाला उपलब्ध करून दिली आणि या कोरोनाच्या विळख्यातून आपला देश बाहेर काढला. तसेच आता इथून पुढे शेतकऱ्यांची वीज बिले माफ होणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे शेतीसाठी सोलार योजना जास्तीत जास्त वाढवणार आहेत,  या विकास कामामुळे जागृत आणि शाश्वत सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टी चे सरकार होय. तसेच यावेळी सुद्धा सुधीर दादा गाडगीळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया आणि आपल्या संपूर्ण सांगली जिल्ह्याचा कायापालट करूया असे सांगितले. तसेच या वेळेचे इलेक्शन हे स्वतः महिलांनी हातात घेतले आहे. 

यावेळी बोलताना सुधीर दादा गाडगीळ म्हणाले की गेल्या 10  वर्षात आपण एक मोठा निधी सांगलीसाठी आणला आहे आणि त्यातून प्रचंड विकास कामे झालेले आहेत अजून काही शिल्लक आहेत ते लवकरच पूर्ण करण्याचा माझा मानस आहे आणि सांगली शहराला एक आयडियल शहर म्हणून असे वेगळे स्थान निर्माण करण्याचा माझा मानस आहे.
यावेळी बोलताना एक महिला म्हणाली की दादा आपल्याकडे ने हे भाग्याचे आहे कारण जिथे जाईल तिथे दादांची विकास कामे दिसत आहेत आणि यावेळी दादा आपल्याकडे आले आहेत त्यामुळे आपले अमूल्य मत सुधीर गाडगीळ यांना देऊन सुधीर दादांना मजबूत करूया.  गावागावातील स्त्रिया आज असे म्हणत आहेत की सुधीर दादांनी एवढी कामे केली आहेत त्यामुळे महिला स्वतः येऊन सांगत आहेत की आम्हाला आमदार म्हणून सुधीर दादाच हवेत आहे सुधीर दादा यांचा स्वभाव म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे.

यावेळी आभार व्यक्त करताना विनायक शेटे म्हणाले की आमचा लिंगायत समाज जेव्हा हक्काने सुधीर दादा यांच्याकडे जात होता तेव्हा मागेपुढे न पाहता सुधीर दादा सरळ हाताने मदत करीत होते आणि आज पर्यंत लिंगायत समाजाला सुधीर दादा यांनी भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे संपूर्ण लिंगायत समाज सुधीर दादा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि यावेळी सुद्धा सुधीर दादांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणणार आहोत.
यावेळी श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग चे अध्यक्ष श्री सुधीर सिंहासनी उपाध्यक्ष श्री दीपक खोकले सेक्रेटरी सुनील कोरे जॉइंट सेक्रेटरी जयवंत मोतुकडे खजिनदार अशोक पाटील, सुनील दादा जयंती उत्सव अध्यक्ष प्रदीप दडगे, सदस्य विनायक शेटे सविता अरळी सतीश मगदूम सुशील हडदरे रमेश दडगे, कार्यक्रम समिती पदाधिकारी विनायक सिंहासने, रवींद्र केंपवाडे, राहुल घेवारे, संजय आडगळे, सुनील हाडदरे, संजय गाडवे, योगेश कापसे, पंचाक्षरी बोळाज, राजेश साबणे, सचिन घेवारे, सुधीर म्हेत्री, रोहित हिडददुगी, रावसाहेब बाळेकडे, एडवोकेट अमोल डोंबे, शिवाजी बाळीगडे, विद्या झाडबुके मीनाक्षी मुद्दम सविता रळी अनुपमा मानेपुरे सुचेता कापसे, पूजा साबणे, सीमा कठमाळे तसेच लिंगायत समाजाच्या महिला व पुरुष प्रचंड संख्येने उपस्थित होते. 

फोटो
 
1) सुधीर दादा गाडगीळ यांनी वीरशैव मुरघाराजेंद्र प्रतिमेचे पूजन केले 
2) लिंगायत समाजाच्या महिलांचा सोबत सुधीर दादा गाडगीळ. 
3) वीरशैव लिंगायत बोर्डिंग समाजाच्या वतीने सुधीर दादा गाडगीळ यांनी सत्कार स्वीकारला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.