Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चहा उकळताना १ चिमूट हा मसाला घाला-फक्कड चहा प्या; आजीनं दाखवली चहा मसाल्याची गावरान रेसिपी

चहा उकळताना १ चिमूट हा मसाला घाला-फक्कड चहा प्या; आजीनं दाखवली चहा मसाल्याची गावरान रेसिपी
 

थंडीचे दिवस  म्हटले की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतो ते म्हणजे चहा. चहा प्यायल्यानं झोप उडते आणि एकदम फ्रेश वाटतं. जर कोणतंही काम करण्याचा मूड नसेल तर तुम्हाला चहा प्यायल्यानं तरतरी येते आणि काम करण्याचा उत्साह टिकून राहतो.

टपरीवर मिळतो तसा फक्कड चहा घरी बनतोच असं नाही. अनेकदा चहा पांचट होतो तर कधी साखर कमी पडते.  अनेकदा सर्व पदार्थ घालूनही चहा हवातसा बनत नाही.  थंडीच्या दिवसांत कडक चहा प्यायचा तर चहा बनवताना त्यात चहा मसाला घालायलाच हवा. चहा मसाला घातल्यानं चहा वेगळीच चव येते आणि चहा सुंदर लागतो.  सोशल मीडियावर आपली आजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजींनी खास पद्धतीनं चहा मसाला करण्याची रेसिपी शेअर केली आहे. 

चहा मसाला करण्याची सोपी रेसिपी
चहा मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवा. गॅसची मंद असावी. उच्च आचेवर पदार्थ जळण्याची शक्यता असते. सगळ्यात आधी कढईत वेलची घालून त्या भाजून घ्या. त्यानंतर त्यात 1 चमचा लवंग, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा दालचिनी, 3 मसाला वेलची, 1 जायफळ, अर्धी वाटी तुळशीच्या मंजिरी घालून भाजून घ्या. हे भाजलेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला, नंतर यात आल्याची पावडर, सुंठाची पावडर घालून बारीक करून घ्या. तयार आहे परफेक्ट घरगुती चहा मसाला.
चहा मसाला वापरण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी पाणी उकळण्यासाठी ठेवा त्यात चहा पावडर घालून उकळवून घ्या. नंतर साखर घाला. चहा उकळल्यानंतर त्यात दूध घाला. दूध घालून चहाला 1 उकळ आल्यानंतर त्यात पाव टिस्पून चहा मसाला घाला. नंतर चहा व्यवस्थित उकळून गॅस बंद करा. या मसाल्याचा वापर केल्यास कडक चहा तयार होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.