Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीवाडी सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशीचिंचबागेतील प्रचार बैठकीत ग्वाही; खेळाडू, कार्यकर्ते यांच्याशी संवाद

सांगलीवाडी सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशी चिंचबागेतील प्रचार बैठकीत ग्वाही; खेळाडू, कार्यकर्ते यांच्याशी संवाद
 
 
 
सांगली, दि.: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशीच सांगलीवाडीतील समस्त जनता राहणार आहे, अशी ग्वाही सांगलीवाडीतील चिंचबाग येथे झालेल्या येथे प्रचार बैठकीत देण्यात आली.

यावेळी सुधीरदादा गाडगीळ यांनी खेळाडू तसेच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. चर्चा केली. माजी आमदार दिनकरतात्या पाटील, महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती  अजिंक्य पाटील यांनी या बैठकीचे संयोजन केले होते. मोठ्या प्रमाणात खेळाडू, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
 

कार्यक्रमस्थळी सुधीरदादांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, घोषणांच्या निनादात  जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागरिक तसेच खेळाडूंच्यातर्फे सुधीर दादांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्य पाटील म्हणाले,   सुधीरदादांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहे. सुधीरदादांच्यामुळेच सांगलीवाडीमधील शंभर टक्के रस्ते पूर्ण झाली आहेत. आता शेताकडे जाण्याचे  रस्तेही दादाच पूर्ण करतील.  
 
आयर्विनला समांतर पुल झाल्यामुळे येथून वाहतूक वाढेल आणि सांगलीवाडीचा  विकासही आता अधिक गतीने होईल. येथील मैदानावर  शंभर ते दीडशे खेळाडू दररोज व्यायाम करतात, खेळतात.  त्यांच्यासाठी दुमजली व्यायामशाळा बांधून मिळावी ही आमची मागणी ही दादाच निश्चित पूर्ण करतील.

अजिंक्य पाटील म्हणाले, यावेळी दादांच्या प्रचारात आणि मताधिक्यात कोणतीही कसर राहणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी यांना सोबत घेऊन आम्ही तुमचा प्रचार धूमधडाक्यात करणार आहोत. अजिंक्य पाटील म्हणाले, सांगली मतदारसंघात प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक कोपऱ्यात सुधीरदादांनी केलेल्या विकासकामांचा फलक आहे. दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे सुधीरदादा गाडगीळ त्यामुळे आम्ही त्यांना सांगलीवाडीतून जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत.
अजिंक्य पाटील म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी सांगलीत श्री गणेश मंदिरापासून होणार आहे. त्यावेळी सांगलीवाडीतून मोठ्या संख्येने खेळाडू तसेच नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. 
 काही खेळाडूंनी बोटक्लबसाठी आणखी निधी, शाळा क्रमांक पाचची दुरुस्ती अशा मागण्या केल्या.  माजी आमदार दिनकरतात्या पाटील म्हणाले,  येथे हायटेक व्यायामशाळा उभारण्यात यावी. सांगलीवाडी येथे बोटिंग आणि कबड्डी हे दोन प्रमुख खेळ आहेत. त्यांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा. 

एक ज्येष्ठ नागरिकाने मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, पूर्वी या गावात विरोधी पक्षाची गाडी येणे सुद्धा अवघड होते. परंतु गेल्या दहा वर्षात सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि सततच्या संपर्कामुळे येथे आता भाजपला कोणतीही अडचण नाही.
 
सुधीरदादा गाडगीळ यांनी खेळाडू तसेच नागरिकांनी या मेळाव्यासाठी आवर्जून बोलावले आणि सत्कार केला याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, माझ्या दोन निवडणुकात सांगलीवाडीने मला भरघोस मतदान केले आहे. येथील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे मी सांगलीवाडीच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम गेल्या दहा वर्षात केले. निवडणूक झाली की पहिल्या सहा महिन्यातच आज येथे उपस्थित केलेले विविध प्रश्न आणि मागण्या  मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी स्वतः खेळाडू आहे, त्यामुळे खेळाडूंना कोणत्या अडचणी येतात याची मला पूर्ण माहिती आहे. त्या सर्व अडचणी दूर करण्याचा मी गेल्या दहा वर्षात प्रयत्न केला आहेच; यापुढेही सांगलीवाडीतील खेळाच्या विकासासाठी अधिक लक्ष देईन. सुधीरदादा यांच्या या ग्वाहीनंतर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांनी सुधीरदादांचा विजय असो अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी अरुण यादव पाटील, प्रवीण पाटील, शंकरअण्णा पाटील, शहाजी पाटील, शरद देशमुख, प्रवीण पाटील, हर्षल पल्ले, सचिन पाटील, सदाशिव पाटील, राहुल पाटील, भरत बर्गे, प्रताप जामदार, एडवोकेट अमोल बोळाज, दत्ता पवार, माणिक पाटील, तसेच रॉयल कृष्णा बोट क्लब आणि युवक मराठा क्रीडा संस्था यांचे खेळाडू, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
फोटो
 
१) सांगली: सांगलीवाडी येथील चिंचबागेत आयोजित बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.  
२) सांगली: सांगलीवाडी येथील चिंचबागेत आयोजित बैठकीच्या वेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी सभापती अजिंक्य पाटील तसेच  खेळाडू, कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत सुधीरदादा गाडगीळ.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.