पृथ्वीराज पाटील यांची गृहभेटीतून प्रचारात मुसंडी.. पृथ्वीराज पाटील यांचा विजय निश्चित आहे.. ज्योती आदाटे
प्रभाग क्र. १८ मधील नागरिकांनी पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणायचा उचलला विडा
सांगली दि.८: प्रभाग क्र. १८मधील स्वामी समर्थ मंदीरात दर्शन व आरती करुन
महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी गृहभेटीतून थेट
मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून
देण्याचे आवाहन केले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांचे महिलांनी ओवाळून औक्षण
केले.
पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगलीसाठी भरीव कामगिरी केली आहे. ते संविधान सन्मान करणारे व गोरगरीब जनतेला मदत करणारे आमचे लाडके भाऊ आहेत. त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. विद्यमान आमदारांनी दहा वर्षांत कांहीच काम केले नाही. खराब रस्ते व गटारी, घाणीचे साम्राज्य, अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा हे प्रश्न जैसे थे आहेत. पृथ्वीराजबाबा हे प्रश्न सोडवू शकतात त्यामुळे ते आमदार झाले पाहिजेत असे लाडक्या बहिणींचे स्पष्ट मत आहे अशी प्रतिक्रिया ज्योती आदाटे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक, अभिजित भोसले, ज्योती आदाटे, ताजुद्दीन शेख, अक्षय शेळके, कल्पना शेळके, मन्सूर नाईक, संभाजी पोळ, कैस शेख, शंकर माने, लखन गवळी, मालन घाडगे, संगिता पवार, असिफ मुजावर व प्रभागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.