Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाढत्या गरिबीमुळे 'हे' आशियाई शहर ठरत आहे 'सेक्स टुरिझम हब'; कारण काय?

वाढत्या गरिबीमुळे 'हे' आशियाई शहर ठरत आहे 'सेक्स टुरिझम हब'; कारण काय?

करोना महामारीमधून अजूनही जग सावरत आहे. अजूनही जगाच्या अनेक भागांत आर्थिक अस्थिरता पाहायला मिळत आहे. असाच एक देश आहे जपान. जपानमधील टोकियो हे शहर सेक्स टुरिझमचे हब ठरत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या शहरात गर्दी करताना दिसत आहेत.

बऱ्याच मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानच्या टोकियोमध्ये गरिबी वाढत आहे आणि जपानमधील चलन खाली घसरत चालले आहे. विकसित देशांपैकी एक असलेल्या जपानवर अशी वेळ का आली? काय आहे सेक्स टुरिझम? टोकियो सेक्स टुरिझम हब कसे ठरत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

‘एससीएमपी’च्या म्हणण्यानुसार, जपान हे आर्थिक शक्तिस्थान होते. तेव्हा जपानी नागरिक परदेशात जात होते. ते रोख रक्कम घेऊन गरीब राष्ट्रांतील महिलांना मदत करत असत. पण आता चित्र पालटल्याचे पाहायला मिळत आहे. “जपान एक गरीब देश झाला आहे,” असे लायझन कौन्सिल प्रोटेक्टिंग युथ्स (सीबोरेन)चे सरचिटणीस योशिहिदे तनाका यांनी ‘दिस वीक इन आशिया’ला सांगितले. तनाका यांनी ‘द स्टार’ला सांगितले की, कोरोना काळातील निर्बंध हटवल्यानंतर अधिकाधिक परदेशी लोक शहराला भेट देत असल्याचे आढळून आले. “आम्ही शहरात बरेच परदेशी पुरुष पाहत आहोत, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, वेगवेगळ्या देशांतील लोक येथे येत आहेत, त्यात गोऱ्या, आशियाई, काळ्या लोकांसह बहुसंख्य चिनी नागरिकांचाही समावेश आहे. तनाका यांनी ‘एससीएमपी’ला सांगितले की, २० वर्षांतील अनेक किशोरवयीन आणि स्त्रिया आता लैंगिक कार्यात उतरताना दिसत आहेत.


अजूनही जगाच्या अनेक भागांत आर्थिक अस्थिरता पाहायला मिळत आहे. असाच एक देश आहे जपान. 
कारण काय?

तज्ज्ञ सांगतात की, यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ‘डेली गार्डियन’च्या म्हणण्यानुसार, पर्यटकांचा ओघ, गरिबीत वाढ आणि येन (जपान चलन) कमकुवत होणे आदी गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की, कोविड-१९ साथीचा रोग महिलांच्या देह व्यापारात जाण्याचे एक प्रमुख कारण आहे. बरेच जण या मार्गाने कर्ज किंवा इतर खर्च भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘एससीएमपी’कडे, १९ वर्षीय रुआ नावाच्या एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. माझ्यावर कर्ज होते म्हणून मी एप्रिलपासून या व्यवसायात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझे कर्ज फेडायचे होते आणि मला कपड्यांसारख्या गरजेच्या गोष्टी विकत घ्यायच्या होत्या,” असे तिने सांगितले.


कोविड-१९ साथीचा रोग महिलांच्या देह व्यापारात जाण्याचे एक प्रमुख कारण आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)
“आमच्याकडे येणारे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष आहेत; परंतु मी म्हणेन की, यात सर्वांत जास्त पुरुष परदेशातील असतात, असे तिने सांगितले. देह व्यापारात गुंतलेल्या महिलांना हिंसाचार आणि लैंगिक आजारांचाही सामना करावा लागतो. कोविड काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे महिलांनी हा मार्ग निवडला आहे. ‘जपान टाइम्स’ने यापूर्वी असे वृत्त दिले होते की, अनेक महिला कर्जात बुडाल्या आहेत. सेक्स वर्क हे परदेशात बेकायदा कारवाया आणि रस्त्यावरील मागणीशी जोडले गेले आहे. ‘मेट्रोपॉलिटन पोलिस डिपार्टमेंट’ (एमपीडी)ने सांगितले आहे की, अटक करण्यात आलेल्या ४३ टक्के महिलांनी सांगितले की, त्या केवळ कर्ज फेडण्यासाठी हा मार्ग अवलंबत आहेत. अटक केलेल्यांपैकी सुमारे ८० टक्के महिला केवळ २० वर्षांच्या होत्या; तर तीन महिला १९ वर्षांच्या होत्या. अनेकांना देशात निर्माण होत असलेल्या या परिस्थितीची चिंता आहे. तनाका यांनी ‘एससीएमपी’ला सांगितले की, त्याने हिंसाचारातील लक्षणीय वाढ पाहिली आहे. “हे खूप वाईट घडत आहे," असे योशिहिदे तनाका म्हणाले. “येथे अधिक हिंसाचार वाढत आहे; परंतु आम्ही आधीच त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करत आहोत आणि यापेक्षा आम्ही जास्त काही करू शकत नाही.”

रुआनेदेखील एका महिलेबरोबर घडलेला हिंसाचाराचा एक प्रकार सांगितला. "काही आठवड्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीवर एका चिनी माणसाने रस्त्यावर हल्ला केला होता," असे ती म्हणाली. "ते पैशांबद्दल बोलत होते. ती व्यक्ती अचानक चिडली आणि त्याने तिला लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या डोक्याला मार लागला आणि तिला गंभीर दुखापत झाली. हे बऱ्याच जणांबरोबर घडत आहे; परंतु मी भाग्यवान आहे. कारण- मी आतापर्यंत सुरक्षित आहे." जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य काझुनोरी यामानोई यांनी ‘जपान टाइम्स’ला सांगितले, “वास्तविकता अशी आहे की, जपान असा देश ठरत आहे, जिथे परदेशी पुरुष तरुण महिलांजवळ जाऊ शकतात आणि लैंगिक संबंधांसाठी पैसे देऊ शकतात. ही आता फक्त घरगुती समस्या राहिलेली नाही. आता जपानी महिलांना आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये कसे पाहिले जाते, ही एक अतिशय गंभीर समस्या आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.