सांगली, दि. १३: पुढील पाच वर्षात गावभागामध्ये एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही. गावभाग सांगली शहरातील एक आदर्श भाग बनवायचा माझा निश्चय आहे, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. येथील पाटील गल्लीत आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, गावभागाने पूर्वी माजी आमदार (कै. )संभाजी पवार (आप्पा) यांना भक्कम साथ दिली होती. माझ्या गेल्या दोन निवडणुकांतही गावभागाने मला भरभरून पाठिंबा दिला. या खेपेसही मला तशाच पाठिंब्याची आणि जनतेच्या आशीर्वादाची खात्री आहे. तुमची कोणतीही समस्या असेल तर माझ्याकडे या मी तुम्हाला निराश करणार नाही.
यावेळी शेखर इनामदार म्हणाले की गावभागाची सुधीरदारांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत येणाऱ्या निवडणुकीत मोठे ताकतीने आपण सुधीर दादांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणूया. सुरेशदादा पाटील म्हणाले, आमदार गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात सांगली शहरासह मतदारसंघाचा विकास केला आहे. पुन्हा एकदा त्यांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे.
आमदार गाडगीळ यांचे प्रचार बैठकीसाठी आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.पाटील गल्ली आणि परिसरातील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीरदादांनी यावेळी नागरिकांशी स्थानिक समस्यांबद्दलही चर्चा केली.यावेळी माजी नगरसेवक शिवराज बोळाज, भारतीय जनता पक्षाचे नेते महावीर कर्वे,धनंजय सुतार, अमोल पाटील, राहुल पाटील, अशोक माने, अभिजीत पाटील,सुजित पाटील, अनिकेत खिलारे, विठ्ठल बने, शितल कर्वे, सतीश पवार आदी उपस्थित होते.
सांगली: गावभागातील पाटील गल्लीत आयोजित प्रचार बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ,शेखर इनामदार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.