सांगली,: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच जिल्ह्यातील अन्य सातही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील असे एका निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना कळविण्यात आले आहे की त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा आणि तसे जाहीर करावे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही महायुतीचाच एक घटक पक्ष आहे. त्यामुळेच सांगली विधानसभा मतदारसंघात आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच जिल्ह्यातील अन्य सात मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवारांना पक्षातर्फे पाठिंबा दिला जात आहे असे निवेदनात म्हटले आहे ह्यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील,अविनाश मोहिते,पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे
अध्यक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज भाई मोमीन जिल्हा
उपाध्यक्ष परशुराम कांबळे,
शहर अध्यक्ष आयुब कालेगार ,
मिरज शहर अध्यक्ष अमर आवळे ,
प्रसिध्दी प्रमुख संतोष गोसावी,
मिरज शहर उपाध्यक्ष मुज्जमिल सौदागर ,
जिल्हा सदस्य सनी सज्जन, इलियास पठाण, मुनीर भाई भालदार अजय कांबळे, शेखर मोरे , आनंद वायदंडे, निजाम खाटीक, रियाज मुतवल्ली आदी मान्यवर उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.