Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणुकीआधीच महायुती एक जागा हरली !

निवडणुकीआधीच महायुती एक जागा हरली !
 
 
लोकसभा निवडणुकीनंतर 'वोट जिहाद'ची चर्चा सुरू झाली ती मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघात झालेल्या एकगठ्ठा मतदानानंतर. या मतदारसंघात भाजपा उमेदवाराला केवळ साडेचार हजार मते मिळाली तर काँग्रेसच्या बाहेरून लादलेल्या उमेदवाराला १.९४ लाख मते पडली आणि मुस्लिम मतांचे गणित उघड झाले.

धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघात कोणताही जनसंपर्क नसताना तिकीट दिले गेले. त्या बाहेरच्या उमेदवार असल्याने धुळ्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात भामरे यांच्यापेक्षा कमी मतदान झाले. सटाणा विधानसभा क्षेत्रात भामरे २१,९१३ मतांनी आघाडीवर होते, धुळे शहरात ४,८३२, मालेगाव बाह्यमध्ये ५५,२४२ धुळे ग्रामीणमध्ये ६३,७९८ आणि शिंदखेडामध्ये ४३,४२५ अशी मतांची आघाडी भामरे यांनी घेतली होती. असे असताना केवळ मालेगाव मध्य या मतदारसंघात बच्छाव यांनी १,९४,३२७ मतांची आघाडी घेत भामरे यांच्यावर ३,८३१ मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात भामरे यांना फक्त ४,५४२ मते मिळाली.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ 'वोट जिहाद'मुळे प्रसिद्ध झाला. आता या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात सर्वच्या सर्व उमेदवार हे मुस्लिम समाजाचे असून एकही नॉन-मुस्लिम नसल्याचे उमेदवार छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. बहुदा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असेल ज्या जागेवर मुस्लिम समजाव्यतिरिक्त एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.

महायुतीकडून भाजपाच्या सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तो बाद झाला. पाटील यांच्याशिवाय महायुतीकडून अन्य एकही 'डमी' अर्ज या मतदार संघात भरण्यात आला नसल्याने निवडणुकीआधीच महायुतीची एक जागा कमी झाली, असे म्हणता येईल.

त्यामुळे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात आता केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून एजाज बेग हे उमेदवार असून समाजवादी पक्षाच्या शानेहिंद निहाल अहमद आणि विद्यमान आमदार 'एमआयएम'चे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक यांच्यात प्रमुख लढत होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.