बामणोलीतून सुधीरदादांना मोठे मताधिक्य देऊ :, ग्रामस्थांची प्रचार शुभारंभ सभेत ग्वाही; गावाच्या विकासाबद्दल समाधान
सांगली, दि.६ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी बामणोली गावाचा चौफेर विकास केला आहे. गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. त्यामुळे या गावातून त्यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही ग्रामस्थांनी प्रचार सभेत दिली.
गावातील श्री भैरवनाथ मंदिरात आमदार गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांनी शंभर टक्के पाठिंबा व्यक्त करणारे मनोगत उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. गावात सुधीरदादांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. श्री भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. कार्यक्रम स्थळी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. सुधीरदादांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
सरपंच गीता चिंचकर म्हणाल्या, या गावासाठी सुधीरदादांनी फार मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. गावातली अनेक कामे त्यामुळे झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण गाव आता सुधीरदादांच्या पाठीशी आहे.
पॅनलप्रमुख सुभाष चिंचकर म्हणाले, गावातील नागरी सुविधांसाठी दादांनी भरपूर पैसे गेल्या दहा वर्षात दिले आहेत. गेल्या दोन वर्षात तर त्यांनी निधीमध्ये भरघोस वाढ केली आहे. श्री भैरवनाथ मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश केल्यामुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. दादांना गावात विरोध करण्यासारखे काही कारणच राहिलेले नाही.
सरपंच विष्णू लवटे म्हणाले, बामणोली गावाकडे यापूर्वी कुणी लक्ष दिलेले नव्हते. परंतु सुधीरदादा आमदार झाल्यानंतर या गावाचे भाग्य उजळले. गावात अनेक विकासकामे झाली. त्यामुळे आम्ही सर्वजण दादांच्या पाठीशीच उभे राहणार आहोत. यावेळी संतोष सरगर, भीमराव रुपनर, किरण भोसले, दिग्विजय चिंचकर, संगीता पाटील, राजेश सनुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, या गावाने मला नेहमीच भरघोस पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच मी या गावात भरपूर विकास कामे करू शकलो. यापुढेही आपल्याला विकासाची ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे. त्यासाठी मला श्री भैरवनाथाची कृपा आणि ग्रामस्थांचे आशीर्वाद हवे आहेत.
सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ बामणोली येथे मोठ्या उत्साहात झाला.
२) सांगली: बामणोली येथे निवडणूक प्रचार प्रारंभ प्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.