Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाविकास आघाडीच्या रणरागिणींनी मतदारसंघ पिंजून काढला..गृहभेटी, गृहबैठका आणि पदयात्रेतून पृथ्वीराज पाटील यांना विजयी करण्याचे केले आवाहन

महाविकास आघाडीच्या रणरागिणींनी मतदारसंघ पिंजून काढला.. गृहभेटी, गृहबैठका आणि पदयात्रेतून पृथ्वीराज पाटील यांना विजयी करण्याचे केले आवाहन
 

सांगली दि.१७: सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या विजयासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकदिलाने मतदार संघ पिंजून काढला. त्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या रणरागिणींनी गृहभेट, गृहबैठका व भव्य पदयात्रेतून मतदार संघात होम टू होम प्रचार केला आहे.

पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाचा निर्धार करुन सौ. विजया पृथ्वीराज पाटील या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या महिलांची मोट बांधून प्रचाराचे रान उठवण्यात यशस्वी झाल्या आहेत. पृथ्वीराज बाबांच्या कार्यावर महिला कार्यकर्त्यांची भाषणे महिलांची मने जिंकणारी ठरत आहेत.महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे प्रचार मोहीम हाती घेऊन पृथ्वीराज पाटील यांनाच मत का द्यायचे.. ते सांगलीच्या विकासासाठी कसे आवश्यक आहे हे पटवून दिल्याने मतदार संघात पृथ्वीराज पाटील यांची बाजू बळकट झाली आहे. 

महाविकास आघाडीच्या पहिल्या फळीतील महिलांनी सांगली मतदारसंघातील बहुतांश भागात प्रचार पूर्ण केला आहे. अंकली, इनाम धामणी व जुनी धामणी, माधवनगर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी, नावरसवाडी, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव, कुपवाड, नांद्रे,  हरीपूर, बामणोली येथे गृहभेट, गृहबैठक व पदयात्रेतून महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. 
सांगली शहरातील विस्तारीत भागातील संजयनगर, वसंतनगर, पंचशील नगर, रामकृष्णनगर, हनुमाननगर, यशवंतनगर, विठ्ठलनगर, सत्यसाईनगर, वर्धमाननगर, घनश्यामनगर, आंबेडकर नगर, शिवाजीनगर, माळीनगर, शामरावनगर, दत्तनगर, राजारामनगर, चिंतामणीनगर, लक्ष्मीनगर, पत्रकार नगर, रामनगर, अहिल्यानगर, भारतनगर, गोमटेश्वर नगर, पार्श्वनाथ नगर, वानलेसवाडी, इ. उपनगरात प्रचार मोहीमेला जोरदार प्रतिसाद मिळाला.
शंभर फुटी, ८० फुटी विश्रामबाग, जिजामाता , मंगलमूर्ती, नागराज,गव्हर्न्मेंट, अलंकार, मगरमच्छ,गणेश,प्रगती, पसायदान, जयहिंद,वाल्मिकी आवास, विद्याविहार,एस.टी., हडको इ. काॅलनीमधून चांगला प्रतिसाद मिळाला. जुनी वसाहत, आंबा चौक, स्फूर्ती चौक, पटेल चौक,जवाहर चौक, लव्हली सर्कल, तात्यासाहेब मळा, जामवाडी, माईघाट, त्रिकोणी बाग, औद्योगिक वसाहत, आंबेडकर रोड, रेड लाईट एरिया, कुपवाड सूतगिरणी परिसर, जुनी धामणी रोड, लक्ष्मी रोड, मार्केट यार्ड व एसटी स्टँड परिसर, लक्ष्मी मंदीर, चाणक्यपुरी, रेपे प्लाॅट, काळे प्लॉट, माने प्लॉट काळी वाट, खणभागात, नळभाग इ. ठिकाणी संपर्क साधून हाताला मतदान करण्याचे आवाहन केले. 

या झंझावाती प्रचार दौऱ्यात विजया पृथ्वीराज पाटील, प्रियांका ऋतुराज पाटील, आश्विनी पाटील - गवारे, राधा मोहन पाटील, आशा पाटील,विशाखा पाटील, उषा पाटील, मिनाक्षी दुगे, ज्योती आदाटे,भारती भगत,प्रतिक्षा काळे, आश्विनी देशपांडे, प्रियांका तूपलोंढे,संगिता हारगे, विद्या कांबळे, छाया जाधव,कल्पना शेळके, प्रियांका पाटील,यास्मीन, सुवर्णा पाटील, नूतन पवार, क्रांतीताई कदम, कविता बोंद्रे,किर्ती देशमुख,सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे, अनिता चोपडे, अरुणा, ज्योती व स्वाती सुर्यवंशी, शरयू पाटील,संगिता जाधव,  कांचन खंदारे, प्रणिता पवार, जयश्री घोरपडे, जन्नत व शमशाद नायकवडी, सुनिता शेरेकर, मानसी भोसले, ज्योत्स्ना, संगिता, शोभा, मालन घाडगे, आशा व अनिता पवार, रुबिना मुजावर, यास्मीन जमादार,गौरी तांदळे, सविता कोरे, सविता चौधरी, राणी कामटे, अनिता शिवशरण, रेहान शेख, उज्ज्वला निकम, संगिता जाधव, प्रियांका भुसारे, रेखा पाटील, हेमलता माने, आवटी जाधव व कोळी मॅडम प्रियांका भुसारी, वैशाली धुमाळ, परवीन फकीर, पूजा आवळे यांनी प्रभावी भाषणे केली. 
तसेच महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देऊन गृहबैठका व पदयात्रेतून महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. सांगली विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या महिलांचा प्रचार दौरा होत आहे. विजया पृथ्वीराज पाटील यांच्या कुशल संघटनकोशल्यामुळे अत्यंत कमी वेळात महिलांनी होम टू होम संपर्क करुन पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याची प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहे. हात चिन्हावर मतदान करुन पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेत पाठवा, सांगलीसाठी खंबीर उभा असलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी कोरोना व महापूर काळात उत्तम काम केले आहे. सांगली समस्यामुक्त करण्याची त्यांची धडपड आहे. भविष्यात सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांचे हात बळकट करा असे आवाहन विजया पाटील यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.