आज सांगली जिल्हा पान असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी पाठींबा देऊन जयश्री पाटील यांना भरघोस मतांनी निवडुन आणण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला .
सांगली शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून छोटे छोटे व्यवसाय करुन आपली व आपल्या कुटुबियांची उपजीविका हे खोकीधारक चालवत आहेत. अशा या खोकीधारकांच्यावर सांगली मिरज कुपवाड महानगरपलिकेची अतिक्रमणाच्या नावाखाली कायम टांगती तलवार होती .
अशा वेळेला माजी मंत्री कै . मदन भाऊ पाटील यांनी या खोकीधारकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालुन खोकीधारकांचे कायमस्वरुपी नगरपालिकेच्या पक्क्या गाळ्यामध्ये व्यवसायांचे पुनर्वसन करुन दिले. त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उर्दरनिर्वाह चा प्रश्न मार्गी लावला . म्हणुन आमची संघटना मदन भाऊ यांना आदरांजली म्हणुन जयश्री पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले . यावेळी प्रदेश अध्यक्ष अजित सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ जमादार, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद जमदाडे, जिल्हा खजिनदार राजु पागे, जिल्हासहसचिव प्रकाश मोरे , महानगर पालिका क्षेत्र कार्याध्यक्ष इम्रान मर्चंट, म. न. पा. क्षेत्र उपाध्यक्ष मयुर बांगर, म.न.पा क्षेत्र उपाध्यक्ष, राजू फोंडे, रावसाहेब सरगर , इम्रान पटेल, राजु खोत, लिंबाजी कांबळे, रामचंद्र सुर्यवंशी, मन्सूर नरवाडे, शब्बीर शेख , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.