Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅबिनेट सचिवालयात नोकरी, 81 हजार पगार; लेखी परीक्षा द्यायची गरज नाही!

कॅबिनेट सचिवालयात नोकरी, 81 हजार पगार; लेखी परीक्षा द्यायची गरज नाही!
 

चांगल्या पद आणि पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यास तुमच्याकडे कमी कालावधी राहिला आहे. अर्ज करण्यापूर्वी पुढे देण्यात आलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील.

पगार
ऑफिस ऑफ डायरेक्टर अकाऊंट, कॅबिनेट सेक्रेटरीएंट या संस्थे अंतर्गत स्टॉक व्हेरिफायर ही पदे भरली जातील.निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या सीपीसीनुसार मॅट्रीक्स लेव्हल 4 नुसार पगार मिळणार आहे. उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना मूळ पगारावर 20 टक्के सुरक्षा भत्ता दिला जाणार आहे. 
अर्जाची शेवटची तारीख

2 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम कॅबिनेट सचिवालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करा. यानंतर अर्जात मागितलेला तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. भरलेला अर्ज आपल्या जिल्हा सैनिक बोर्ड किंवा राज्य सैनिक बोर्डच्या माध्यमातून जमा करा. ऑफलाइनसोबतच अधिकृत ईमेल आयडी dgrddemp@desw.gov.in वर अर्ज पाठवावा लागेल.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार
एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. एसबीआय भरती अंतर्गत एकूण 171 पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स) चे 1 पद,DGM (घटना प्रतिसाद) चे 1 पद, सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) ची 42 पदे, असिस्टंट मॅनेजर(इंजिनियर-इलेक्ट्रिकल) ची 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर)ची 101 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) चे 1 पद भरले जाणार आहे. एसबीआय भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC उमेदवारांकडून 750 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एसएसी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 12 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. या तारखेनंतर आलेले स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.