Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संयम सुटला! सुप्रिया सुळे चिडल्या, म्हणाल्या माझ्या 80 वर्षाच्या बापाला तुम्ही पक्षातून बाहेर काढलं ,आता जर...

संयम सुटला! सुप्रिया सुळे चिडल्या, म्हणाल्या माझ्या 80 वर्षाच्या बापाला तुम्ही पक्षातून बाहेर काढलं ,आता जर...
 

पुणे : पक्ष घेऊन जा, चिन्ह घेऊन जा पवार साहेबांना नोटीस पाठवा. माझ्या 80 वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांच नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा सहकाऱ्यांना सुनावलंय.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सातबारावर तुमचं नाव आहे. त्यांचं नाही म्हणून ही तुमची लेक लढतीये. सत्य परेशान हो सकता है पराजीत नही, पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेक आहे. आज माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकल जो पक्ष माझ्या वडिलांनी काढला, जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला. मंत्री पदाला हे पुढे आणि कष्ट करायला माझा बाप पुढे. कितीवेळा राज्यात दौरे तुम्ही केले सांगा. जो चोरी केलेला माल आहे तो सोडा, तेवढी दानत दाखवा.
आई वडिलांवर टीका सहन करणार नाही: अजित पवार

कोणावरही टीका करा पण माझ्या आई वडिलांवर टीका सहन करणार नाही. माझ्यावर टीका करा, रोहितवर, जयंतरावांवर टीका करा, आमच्या सगळ्यांवर टीका करा आम्हाला प्रॉब्लेम नाही पण आई- वडिलांवर टीका सहन करणार नाही. आमचे वडील काही तुमच्यासारखे मंत्री पदासाठी लाईनीत उभे नव्हते, त्यांनी जे पण केलं ते स्वतःच्या ताकदीवर केलं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आंबेगाव, शिरूर मध्ये गेल्या पाच वर्षाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. वळसे पाटील कुटुंब व आमचे चांगले संबंध आहेत. नाती जपायला ताकद लागते तोडायला ताकद लागत नाही. आंबेगावत आमृची प्रेमाची नाती आहेत. वळसे कुटुंबाचं नाते माझ्या वडिलांशी नाही, माझ्या आजीशी आहे . माझ्या वडिलांची ताकद मी आणि माझी आई नाही तर ही जनता आहे. तू आणि तुझी आई खूप त्रास देतात म्हणून पवार साहेब नेहमी बाहेर असतात. आम्ही त्यांना टीव्ही वर बघतो . त्यांचं औषध किंवा टॉनिक जनता आहे. आंबेगाव व शिरूरचे आमच्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.