अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर इथं उमेदवाराच्या गाडीवर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांनी गोळ्या झाडल्या. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत येत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा प्रकार घडला. गोळी मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अशोक सहकारी साखर कारखान्यासमोर तिघांनी गोळीबार केला. गोळी मिसफायर झाल्यानं ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.