पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 57 वर्षीय व्यक्तीवर दारुच्या नशेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील धानोरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका 24 वर्षीय आरोपीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिन्स प्रेमकुमार सिंग (वय-24, रा. धानोरी, पुणे) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिन्स हा पीडित व्यक्तीच्या ओळखीचा आहे. आरोपीने तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला दारू पाजून दारुच्या नशेत त्यांच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर त्याचे अश्लील फोटो काढून ते नातेवाईक, ओळखीचे लोक व मित्र यांना पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली.
आरोपीने फिर्यादीकडून नवीन मोटारसायकल व मोबाईल घेतला. तसेच वेळोवेळी 2 हजार, 5 हजार असे एकूण 20 ते 25 हजार रुपये घेतले. तो सतत फिर्यादीकडे पैशांची मागणी करत होता. तसेच मागील दीड वर्षांपासून बदनामी करण्याची धमकी देत लुटमार व लैंगिक शोषण करत होता. या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी प्रिन्स सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.