बहुजन समाज पक्षाचे उमेदवार ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर 40 ते 50 अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 40 ते 50 अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात ॲड. शंकर चव्हाण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यानंतर शंकर चव्हाण यांच्यावर चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केली असून सध्या त्यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहे. या हल्यामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सध्या करत आहेत.
40 ते 50 अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला
ॲड. शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टी चे चिखली विधानसभेचे उमेदवार आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास शंकर चव्हाण हे त्यांच्या स्वतः च्या मेहकर फाटा परिसरात हॉटेलवर लक्ष्मी पूजन आटोपून सहकाऱ्यांसह बसले होते. यावेळी काही अज्ञातांना तेथे येत हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार 40 ते 50 अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. यातील काही जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्यानी जबर मारहाण केली आहे. मारहाणीत उमेदवार शंकर चव्हाण हे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी चिखली शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर चिखली पोलिस हल्लेखोरांच्या शोधात आहे. मात्र हा हल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बुलढाण्यात महायुतीतील वाद पेटला
आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात बंडखोरीला उत आला आहे. दरम्यान, महायुतीसाठी एक बंडखोरी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी असली तरी बुलढाण्यात मात्र सर्वात मोठी बंडखोरी आपल्याला बघायला मिळत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्याविरुद्ध आता भारतीय जनता पक्षाचे माजी आ. विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून संजय गायकवाड यांना आव्हान दिला आहे.
भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण का बंडखोरी करतोय याची धक्कादायक कारणेही त्यानी सांगितली आहेत. यावेळी ते म्हणाले की, मी बंडखोरी केली नाही. मी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली आहे. मला आशा आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला लवकर परवानगी देतीलच. शिवसेनेच्या उमेदवाराने गेल्या पाच वर्षात आमच्या भाजपाच्या गाव पातळीपासून देशपातळीवरील नेत्यांना अपमानित केलं आहे. आमचे ऋषितुल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या या उमेदवाराने शिवी देत अपमानीत या शिंदे गटाच्या उमेदवाराने केलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.