Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे महामार्गावरील टोनाक्यावर तब्बल 23 कोटींचे सोने, बिस्किटे पकडली; तफावत आढळल्याने व्यावसायिक अडचणीत?

पुणे महामार्गावरील टोनाक्यावर तब्बल 23 कोटींचे सोने, बिस्किटे पकडली; तफावत आढळल्याने व्यावसायिक अडचणीत?
 
 
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेचे कठोर पालन केले जात आहे. अनेक महामार्गांवर वाहनांची तपासणी करण्यासाठी राज्यभर चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. त्यात राज्यभरात पैसे, सोने आढळून येत आहे.

गुरुवारी रात्री नगर-पुणे  महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर एका चारचाकी वाहनातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. दागिने आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, तेव्हा चार कोटी रुपयांचे दागिने असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने 23 कोटी 71 लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधील  एका सराफ व्यावसायिकाचे आहे. परंतु दागिने व किंमतीमध्ये तफावत आढळ्याने आता हा व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाचे अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सोने-चांदी वाहतूक करणारे वाहनातून सुमारे 23 कोटी 71 लाख 94 हजार रुपयांचे हिरे, सोने व चांदी पकडलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

नगर-पुणे महामार्गावरुन एका चार चाकी वाहन सुपा टोल नाक्यावर आले असता, तेथील तपासणी नाक्यावरील अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी व हिरे असल्याचे निष्पन्न झाले. ही गाडी पुण्यावरुन अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे गाडीतील व्यक्तींनी सांगितले.

या गाडीमध्ये तीन व्यक्ती होत्या. सुरूवातीला त्यांच्या जवळील बिलावरुन गाडीमध्ये चार कोटी 97 लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर निवडणूक अधिकारी, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, आयकर अधिकारी यांनी पंचांसमक्ष पंचनामा केला. तेव्हा गाडीमध्ये जास्तीचे बिले व सोने आढळून आले. यामुळे पोलीस, आयकर व निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली मोजमापास केले. त्यात सोन्याचे तयार दागिने, सोन्यांची बिस्किटे, चांदीच्या विटा व डायमंड आढळून आले. गाडीसोबत दाखवलेली बिले व प्रत्यक्ष असलेला माल यात मोठी तफावत आढळून आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.