Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
 

मुंबई : सध्या राज्यात निवडणुकीचं वातावरण आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे अनेक कामं ही नियमांना लक्षात घेऊनच करावे लागत आहेत. असे असले तरी महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांनी कोट्यवधीची रक्कम जप्त केली आहे.

असे असतानाच आता मुंबईतील वडाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका इलेक्ट्रिशियनकडे तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे चेंडू सापडले आहेत. पोलिसांकडून याबाबत तपास केला जातोय.

नेमका प्रकार काय आहे? 

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्री एका इलेक्ट्रिशियनकडून तब्बल 1 कोटी 11 लाख किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आले. हा इलेक्ट्रिशियन मूळचा चेन्नईचा असल्याचे समोर आले असून त्याचे नाव अब्दुलकर अब्दुल मजीद असे आहे. त्याने डोंगरी येथे राहणाऱ्या शकील नावाच्या एका व्यक्तीकडून हे सोन्याचे चेंडू घेतले होते. हे चेंडू मजीद याला अंधेरीतील एका व्यक्तीकडे सोपवायचे होते. मात्र ही डील होण्याआधीच पोलिसांनी या इलेक्ट्रिशीयनला अटक केली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 

1 कोटी 11 लाख रुपयांचे सोने

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वडाळा परिसरात अब्दुल मजीद याच्या काही संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. पोलिसांनी त्याला हेरलं. त्यानंतर त्याची चौकशी केली. झडती करत असताना पोलिसांना त्याच्याकडे 1 कोटी 11 लाख रुपयांचे एकूण 1457.24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेंडू सापडले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याजवळ असलेल्या सोन्याचे बील त्याला विचारण्यात आले. मात्र आरोपी अब्दुल मजीद त्याच्याजवळ असलेल्या कोणत्याही सोन्याचे बील देऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेले सर्व चेंडू हे प्लास्टिक टेपने गुंडाळलेले होते. 

सोन्याची डील नेमकी कशी होती?

आरोपी अब्दुल याची पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार हे सोने शकील नावाच्या व्यक्तीचे आहे. तो चेन्नई येथून डोंगरीतील दर्गा या भागात होता. तो याच भागातील एका हॉटेलमध्ये थांबला. त्यानंतर अब्दुल याच्या चुलत भावाने हे चेंडू शकीलकडून घेऊन अंधेरीतील एका व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी दिली. मात्र ही डील पूर्ण होण्याआधीच बिंग फुटले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.