मुंबई: फोन वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. अन्यथा खिशाला फोनच्या ईएमआयसोबतच दुरुस्तीच्या खर्चाचाही भार येऊ शकतो. सध्या अँड्रॉइड फोनसोबत चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी केबल मिळते.
ही केबल नीट वापरायला हवी. नवीन फोन खरेदी केल्यावर त्याच्यासोबत मिळणाऱ्या चार्जिंग केबलमुळे फोन खराब होत नाही. काही जण केबल खराब झाल्यावर नवीन खरेदी करतात. ती केबल ओरिजनल नसते. कमी किमतीत ही केबल घेतलेली असते. अशा स्वस्तातल्या, खराब क्वालिटीच्या केबलमुळे फोन खराब होण्याचा धोका असतो. थोडे पैसे वाचवण्यासाठी खूप जण डुप्लिकेट चार्जर घेतात आणि ते वापरून फोनचं नुकसान झाल्यावर त्याहून जास्त पैसे फोन दुरुस्त करायला घालवतात. त्यामुळे चार्जिंग केबल घेताना खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे.
यूएसबी टाइप सीमुळे फोन खराब कसा होऊ शकतो?
चार्जिंग पोर्ट : फोन चार्जिंग करण्यासाठी ओरिजनल चार्जर हा सर्वांत सुरक्षित पर्याय आहे. तुम्हाला मार्केटमध्ये कमी किमतीत अनेक डुप्लिकेट फोन चार्जर मिळतील. त्यामुळे फोन नीट चार्ज होतानाही दिसेल; मात्र त्याची क्वालिटी खराब असते. खराब क्वालिटीच्या केबलमुळे फोनचा चार्जिंग पोर्ट खराब होण्याचा धोका वाढतो.यूएसबी टाइप सी केबलचा योग्य वापर कसा करायचा?
शॉर्टसर्किट : फोनची केबल खराब क्वालिटीची असेल तर ते धोकादायक असतं. कारण खराब क्वालिटीच्या केबलमुळे फोनचे इलेक्ट्रिक पार्ट्स खराब होण्याचा धोका खूप वाढतो.
फोन ओव्हरहीट होण्याची समस्या : केबलची क्वालिटी चांगली असेल तर फोन चार्ज लवकर होतो. खराब क्वालिटीची केबल जास्त करंट घेते. त्यामुळे फोन ओव्हरहिट होण्याची समस्या उद्भवते. केबल क्वालिटी चांगली नसल्यास फोनच्या बॅटरी लाइफवर परिणाम होतो. काही वेळा बॅटरी खराब होऊ शकते.
फोन वर्षानुवर्षं चांगला चालावा, त्यात बॅटरीशी संबंधित समस्या येऊ नयेत, असं तुम्हाला वाटत असेल तर चार्जिंगसाठी फक्त ओरिजिनल चार्जरच वापरा. अन्य कोणताही नको. त्यासाठी थोडे जास्त पैसे घालवावे लागले, तरी चालतील. फोन केबलला लावला असेल तर तो काढताना फोन ओढू नका. अगदी सहजपणे तो फोन काढा. असे केल्याने तुमचा फोन डॅमेज होणार नाही आणि केबलही जास्त काळ टिकेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.