Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात निवडणुकांच्या घोषणा कधी? इलेक्शन कमिशनमधून आली महत्त्वाची Update

महाराष्ट्रात निवडणुकांच्या घोषणा कधी? इलेक्शन कमिशनमधून आली महत्त्वाची Update


नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र तसंच झारखंड विधानसभा निवडणुका कधी होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपसह काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसत आहेत.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक कधी होणार? तसंच निवडणुका किती टप्प्यात होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

न्यूज 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा याच आठवड्यात होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये एक किंवा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ सकते, पण एकाच टप्प्यात निवडणूक घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. याआधी महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका व्हायच्या. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.

दुसरीकडे झारखंडमध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. सुरक्षेची कोणतीही कमी नाही, तसंच झारखंडमधली परिस्थितीही सामान्य आहे, त्यामुळे झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी दिली आहे. दिवाळी आणि छट लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित करेल, असंही निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप नेते दिल्लीत

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात उद्या भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीसंदर्भात चर्चा होणार आहे, त्यानंतर हीच यादी दिल्लीच्या नेतृत्वापुढेही ठेवली जाणार आहे. आचारसंहिता जाहीर होताच भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.