Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओठांना लिप्सटिक, डोळ्यात काजळ, अंगावर साडी, IAS अकादमीमध्ये मिळाली अनुकूलची डेडबॉडी

ओठांना लिप्सटिक, डोळ्यात काजळ, अंगावर साडी, IAS अकादमीमध्ये मिळाली अनुकूलची डेडबॉडी


मानसिकदृष्ट्या निराश आणि हतबल झालेल्या व्यक्ती कधीकधी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. उत्तराखंडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. उत्तराखंडमधल्या मसुरी इथे एका सरकारी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मृतदेह अतिशय धक्कादायक स्थितीत होता. या सरकारी कर्मचाऱ्याने आपल्याच क्वार्टरमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. गळफास घेण्याआधी त्याने स्वत:चा मेकअप केला होता. त्याच्या ओठांवर लाल लिपस्टिक लावलेली होती आणि त्याने साडीही नेसलेली होती.

या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव अनुकूल रावत (वय 22 वर्षं) आहे. तो लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कार्यरत होता. त्याला राहण्यासाठी सरकारी क्वार्टरदेखील मिळाली होती. याच क्वार्टरच्या खोलीत त्याने जीवन संपवलं. अनुकूलने बुधवारी रात्री साडी नेसली, काजळ आणि लिपस्टिक लावली. स्त्रीसारखा पूर्ण मेकअप करून त्याने गळफास लावून घेतला.

सेक्शुअल डिसऑर्डरमुळे त्याने जीवन संपवलं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल रावत हा मूळचा श्रीनगरमधल्या गढवाल इथला उफाल्डामधला रहिवासी होता. अनुकूलला दीड वर्षांपूर्वी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या (एलबीएस) मल्टी टास्किंग स्टाफमध्ये नोकरी मिळाली होती. हॅप्पी व्हॅली इथल्या सरकारी क्वार्टरमध्ये तो एकटाच राहत होता.

अनुकूल गुरुवारी ड्युटीवर हजर न झाल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्याची खोली आतून बंद असल्याचं कर्मचाऱ्यांना आढळलं. पोलीस आल्यानंतर सुताराच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये अनुकुलचा मृतदेह साडी नेसलेल्या आणि महिलेप्रमाणे मेकअप केलेल्या अवस्थेत लटकलेला होता. पोलिसांनी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांशी अनुकूल फारसा बोलत नव्हता.


काही महिन्यांपूर्वी आणखी एका व्यक्तीनेही अशाच प्रकारे जीवन संपवलं होतं. पंतनगर इथल्या विमानतळाच्या सहायक व्यवस्थापकाचा मृतदेह अशाच स्थितीत आढळला होता. त्यानेदेखील महिलेचा ड्रेस घालून आणि मेकअप करून गळफास घेतला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.