"राहुल गांधी असायला पाहिजे लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे 'टार्गेट' ; 'या' नेत्याचे धक्कादायक विधान, FIR दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच दाव्यावर पोलीस तपास करत आहेत. एवढेच नाही तर तो आगामी काळात आणखी काही बॉलिवूड स्टार्स आणि राजकारण्यांना
टार्गेट करू शकतो असेही म्हटले जात आहे. दरम्यान, ओडिया अभिनेता
बुद्धादित्य मोहंती याने एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई यांना राहुल
गांधींना पुढील लक्ष्य बनवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त
विधानावरुन आता गदारोळ सुरु आहे.
या संदर्भात, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया ने ही वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल एका ओडिया अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधींबद्दल सांगितले ‘ही’ गोष्ट
बुद्धादित्य
मोहंती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मोहंती यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा
सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य
राहुल गांधी असावेत, मात्र, या पोस्टवर गदारोळ झाल्यानंतर त्यांनी ते
हटवले.” त्यांच्या पोस्टला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने कडाडून
विरोध केला होता. एनएसयूआयने आपल्या नेत्याविरोधात अशी वक्तव्ये खपवून
घेतली जाणार नसल्याचे म्हटले होते. नॅशनल
स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल एका ओडिया अभिनेत्याविरोधात
तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
सोशल मीडियावर माफी मागितली
वाद वाढल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली. त्यांनी लिहिले, “राहुल गांधीजींबद्दलच्या माझ्या मागील पोस्टचा उद्देश त्यांना टार्गेट करणे किंवा त्यांना हानी पोहोचवणे किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे हा नव्हता. माझा हेतू त्यांच्याविरोधात लिहिण्याचा नव्हता. जर नकळत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील. होय, मी माफी मागतो. मनापासून.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.