धक्कादायक! एकाला अॅसिड टाकून जाळलं, दुसऱ्याला कोयत्याने भोकसलं, संभाजीनगर हादरलं!
छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशाच्या दैवाणघेणावीवरुन भयंकर घटना घडली आहे. तीन जणांनी दोन व्यक्तींवर जिवघेणा हल्ला केला. एका व्यक्तीला चाकू कोयत्याने भोकसलं, त्यानंतर एका व्यक्तीला अॅसिडने जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
खुलताबाद येथील कागजीपुराजवळ मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. एका व्यक्तीला चाकू अन् कोयत्याने सपासप वार केले. तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर अॅसिड टाकून जाळण्यात आले. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खुलदाबाद पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलेय. उपविभागीय पोलीस अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आनंद बाबासाहेब वारे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पोलिसांपुढे जबाब नोंदवला. वारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, आकाश कैलास रणधीर हा मंगळवारी रात्री वेरुळला जायचं म्हणून दुचाकी घेऊन आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. पण तिथे गेल्यानंतर मयूर पाटणी याने नंद्राबादजवळच्या परमीट बारवर बोलवलं. मयूरसोबत तिथे नितीन ठाकरे देखील होता. परमीट बारवर सर्वांनी दारु प्यायली. रात्री साडेअकराच्या सुमारास शेख नावेद त्याठिकाणी आला. मयूर पाटणीने आकाशला सात हजार रूपये दिले. मात्र, आकाशने अजून दहा ते १२ हजार मागितले. त्यावेळी दोघांमध्ये थोडीबाचाबाची झाली.त्यावर मयूर पाटणी याने आम्हाला दोघांना (आकाश रणधीर व आनंद वारे) हॉटेलच्या मागे घेवून गेला. मयूरने अचानक आनंद वारेचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर चाकू-कोयत्याने वार केले. शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावरवर वार केले. त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी वारे याने पळ काढला. मित्राच्या मदतीने त्याने घाटी रुग्णालय गाठले. आकाश यालाही उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेहण्यात आले. पण आकाशच्या डोळ्यावर, तोंडावर सगळ्या अंगावर अॅसिड टाकण्यात आले. उपचार सुरु असताना आकाशचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.