फुकट दारू दिली नाही, गावगुंडांनी वाईच्या वाईन शॉपची तोडफोड केली; कामगारांनाही मारहाण केली!
वाई शहरातील विशाल वाईन्स या दारूचे दुकानात गावगुंडांना मोफत दारू दिली नाही, म्हणून वाईन शॉपची तोडफोड करण्यात आली, तसेच मोठे नुकसान करून कामगारांना देखील मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर वाईतील वाई लिकर असोसिएशनच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील अधिकृत मद्य व्यवसाय असलेल्या विशाल वाईन्स या दुकानात अज्ञात गुंडाने प्रवेश करत मोफत दारूची मागणी केली. त्याला कामगारांनी विरोध केला, म्हणून त्यांनी दुकानाची तोडफोड करत कामगारांनाही मारहाण केली. या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले.
वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची या घटनेनंतर वाई असोसिएशनने भेट घेत निवेदन दिले यामध्ये संबंधित गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. आम्ही अनेक वर्षापासून अधिकृतरित्या शासनाच्या परवानगीने मद्य व्यवसाय करतो, मात्र अलीकडच्या काळात अशा स्वरूपाची गुंडगिरी वाढली आहे. वाईतील घटनेची आम्ही तक्रार केलीच आहे, मात्र भविष्यामध्ये अशा संदर्भातील घटना घडून येत यासाठी कठोर कारवाईची गरज आहे. वाई मध्ये काही तडीपार व्यक्ती फिरत असल्याची गंभीर बाब लक्षात घ्यावी, अशी देखील मागणी यासंदर्भात करण्यात आली आहे. यावेळी श्रीकांत सावंत, सचिन फरांदे, विशाल चोरगे, लालू शिंगटे यांच्यासह अशोक गायकवाड, अशोक लोखंडे, वाईतील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.