म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला; किरण रिजिजू यांचा धक्कादायक दावा
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदेमंत्री झाले होते. मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांचे विचार जुळत नव्हते म्हणून बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला, असा दावा माजी कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विशेष
असा कोणताही कार्यक्रम झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
किरण रिजुजी आज नागपूरला दीक्षाभूमी येथे गेले गेले होते. हा दिवस आपल्यासाठी खास आहे. मागील निवडणुकीत बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला. मुख्यमंत्री असताना मोदींनी संविधान यात्रा काढली, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी 26 नोव्हेंबरला संविधान दिवसाची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान वाचवण्याचा नारा देण्याचं काम केले. मात्र कॉंग्रेसने कधी बाबासाहेब आंबेडकर यांना कधी ओळख मिळू दिली नाही आणि तेच लोक संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करत होते.या दृष्ट प्रचारावर समुदायाच्या लोकांनी कसा काय विश्वास ठेवला? अशा प्रचारावर विश्वास ठेवल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना दुःख झालं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मस्थान महू आणि शिक्षण लंडनमध्ये झालं. बाबासाहेब राहिलेलं लंडनमधील घर मोदींनी देशासाठी विकत घेतलं आणि म्युझियम बनवलं. दीक्षाभूमी चैत्यभूमीपर्यंत विकास केला, तीर्थक्षेत्र घोषित केले. मात्र काँग्रेसने संविधान हटवणार असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी आणि सरकारवर केला.आज तेच काँग्रेसवाले सविधान हातात घेऊन नाटक करत आहेत.
महाराष्ट्रात बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे. माणसाच्या नावावर असलेले स्थळ आहे त्या ठिकाणी संविधान भवनाची निर्मिती करणार, यासंदर्भात मुख्यमंत्री एखनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही केली.काँग्रेस सरकारच्या काळात बौद्ध समाजाला आर्थिक मदत दिली गेले नाही.वक्फ संशोधन बिल मंत्री म्हणून संसदेत सादर केले. वोट बँक म्हणून मुस्लिम संमाजाचं नुकसान झालं. वक्फ अमेनडेंट बिल आणले आहे. मुसलमान नाही पण गरीब मुसलमान यांना न्याय मिळाला नाही, वक्फ च्या जागेचा वापर करत त्यांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे, येणाऱ्या अधिवेशसनात हा मुद्दा मांडणार, असल्याचं आश्वास त्यांनी दिलं. तसंच राहुल गांधी हे विरोधीपक्ष नेता होणं, हे देशासाठी पाप आहे, त्यांचा तोंडातून संविधान शब्द निघणे हे पाप आहे. Sc st लोक हे राहुल गांधीला डोक्यावर घेऊन नाचणार असतील तर मला राग येणार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.