बांधकाम परवान्यासाठी नऊ लाखांच्या लाचेची मागणी:, अभियंत्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल
बीड : बांधकाम परवाना देण्यासाठी नगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने बारा लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती नऊ लाख रुपये खासगी इसमाकडे देण्यास सांगणाऱ्या अभियंत्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवारी अभियंत्याच्या राहत्या घरी करण्यात आली. फारुकी अखिल अहेमद वकील अहेमद (कनिष्ठ अभियंता नगर परिषद, बीड) व किशोर खुरमुरे (खासगी इसम) असे लाच घेतांना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे तसेच त्यांच्या शेजारी बांधकाम परवाना काढण्यासाठी नगररचना विभागातील अभियंता फारुकी अखिल यांचे खासगी मदतनिस किशोर खुरमुरे यांच्या मार्फत बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.बुधवारी नऊ लाख रुपये खासगी इसमाकडे देण्यासाठी सांगणाऱ्या फारुकी अखिल याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.