Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेच्या पिक्चरचा पार्ट २ आता दिसेल

विधानसभेच्या पिक्चरचा पार्ट २ आता दिसेल
 

पलूस : लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काम केले, तो पिक्चरचा 'पार्ट वन' होता. आता विधानसभा निवडणुकीत 'पार्ट २' दिसेल, असे माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. येणाऱ्या २८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या विकासाला कलाटणी देणारी ही निवडणूक

असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ते दुधोंडी, कुंडल जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, गटनेते सुहास पुदाले, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले आदी उपस्थित होते.

 

कदम म्हणाले, आज मतदारसंघात पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे नेते उगवायला लागले आहेत. ज्या लोकांनी कोरोना, महापुरामध्ये काम केले नाही, गेले साडेचार वर्षे कधी लोकांकडे फिरकलेच नाहीत, ते आता आपल्या समोर येत आहेत. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राज्य सरकारला लाडक्या बहिणीची आठवण आली. शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद करून पाचशेचा घ्यायला लावला आहे. त्यामुळे हे पाकिटमार सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. 

जे. के. (बापू) जाधव, महेंद्र लाड, पांडुरंग सूर्यवंशी, मारुती चव्हाण, गिरीश गोंदिल आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले, वसंतदादा कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत, साबतपूर सरपंच प्रल्हाद जाधव, शिवभवानी समूहाचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, संदीप जाधव, प्रशांत नलावडे, पलूस- कडेगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव, पांडुरंग सूर्यवंशी, सर्जेराव पवार, भरत इनामदार, शरद शिंदे, द्राक्ष बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, गिरीश गोंदिल, विशाल दळवी, मिलिंद डाके उपस्थित होते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.