Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादांकडून मुष्टीयुद्धाचे प्रात्यक्षिक गावभागातील श्री आदि बलभीम व्यायामशाळेत भेट

सुधीरदादांकडून मुष्टीयुद्धाचे प्रात्यक्षिक गावभागातील श्री आदि बलभीम व्यायाम शाळेत भेट
 
 
सांगली, दि.३१ : येथील गावभागातील श्री आदि बलभीम व्यायामशाळेस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली. त्यावेळी तेथे उपस्थित खेळाडू आणि जिम मधील व्यायामपटू यांनी सुधीरदादांचे सहर्ष स्वागत केले. दादांनी खेळाडूंबरोबर चर्चा करीत असतानाच  मुष्टीयुद्धाचीही झलक दाखवली.

सांगलीत गावभागातील आदि बलभीम व्यायाम शाळा ही एक ऐतिहासिक संस्था आहे. या संस्थेतर्फे मल्लखांब, कबड्डी, खो-खो अशा खेळांचे फार पूर्वीपासून प्रशिक्षण दिले जाते. अनेक नामवंत क्रीडापटूंनी या व्यायाम शाळेचे नाव देशभर मोठे केले आहे. या व्यायामशाळेत सुरू असलेल्या उपक्रमांची  माहिती दादांनी घेतली. खेळाडूंबरोबर चर्चा केली. दादा एकेकाळी हौशी मुष्टीयोद्धे (बॉक्सर) होते. त्यामुळे त्यांनी त्यांनी यावेळी मुष्टीयुद्धाच्या प्रात्यक्षिकाची एक झलक दाखवली.

यावेळी मो.बा. जोशी, नंदकुमार बापट, केदार खाडिलकर ,समीर गाडगीळ, राम वेलणकर, वैभव माईंणकर, प्रदीप ताम्हणकर, मकरंद कुलकर्णी,विनायक खाडीलकर आदि उपस्थित होते.

फोटो 
 
सांगली: गावभागातील श्री आदि बलभीम व्यायाम शाळेस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली. त्यावेळी मुष्टीयुद्धाच्या प्रात्यक्षिकाची एक झलकही दाखवली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.