Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादा आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत नागरिकांची ग्वाही ;वारणाली परिसरात सुधीरदादांची भेट

सुधीरदादा आम्ही तुमच्या पाठीशी  राहणार आहोत नागरिकांची ग्वाही ;वारणाली परिसरात सुधीरदादांची भेट
 

सांगली, दि.२८ : सुधीरदादा गेल्या दहा वर्षात वारणाली, विश्रामबाग परिसरात तुम्ही केलेल्या  कामामुळेच या भागाचा विकास झाला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याच पाठीशी राहणार आहोत, अशी ग्वाही वारणाली परिसरातील नागरिक तसेच खेळाडू यांनी दिली.

सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सोमवारी सकाळी वारणाली परिसरातील प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंबरोबरही त्यांनी चर्चा केली.

नागरिक म्हणाले, गेल्या दहा वर्षात तुम्ही या भागाकडे सातत्याने लक्ष दिले आहे. या भागातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापूर्वी या परिसराकडे कुणी फिरकत सुद्धा नव्हते. या भागात रस्ते, गटारी अशी कामे तुमच्याच कारकिर्दीत झाली आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्याच पाठीशी ठामपणे राहणार आहोत. तुम्ही विजयाची बिलकुल काळजी करू नका. आम्हीच घरोघर तुमचा प्रचार करू.

माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, विष्णू माने, कल्पना कोळेकर, विश्वजीत पाटील, चेतन माडगूळकर, सुनील भोसले, विजय साळुंखे, यांनी सुधीरदादांचे स्वागत केले. यावेळी दादांनी तेथे सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांबरोबर चर्चा केली. तसेच हॉलीबॉल खेळत  असलेल्यांबरोबरही संवाद साधला.

फोटो 
१)  सांगली: वारणाली परिसरातील  नागरिकांबरोबर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सोमवारी सकाळी संवाद साधला.
 
२)  सांगली: वारणाली परिसरात हॉलीबॉल खेळत असलेल्या खेळाडूंबरोबरही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी चर्चा केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.