अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पूत्र अनंत अंबानी यांनी सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंची भेट त्यांनी घेतली होती. परंतू, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अनंत अंबानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
अनंत अंबानी हे शुक्रवारी मध्यरात्रीच देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचे समजते आहे. भेटीमागचे कारण समोर आलेले नसले तरी काही व्यावसायिक कारण किंवा एखादा कार्यक्रम निमंत्रण आदी असेल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे.
अनंत अंबानी यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी तेजय ठाकरे देखील उपस्थित होते. तर यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. यावेळी या लोकांसोबत अंबानींनी दीड-दोन तास चर्चा केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.