पुरुष बायकोजवळ यौन इच्छा व्यक्त करणार नाही तर कुठे करणार? हायकोर्ट
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका व्यक्तीवरील हुंडाबळीचे आरोप फेटाळताना मोठी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, जर पुरुषाने पत्नीकडून लैंगिक सुखाची मागणी केली नाही तर तो जाणार कुठे?
न्यायमूर्ती अनिश कुमार गुप्ता यांनी प्रांजल शुक्ला आणि इतर दोघांविरुद्धचा खटला फेटाळून लावला, असे म्हटले की, एफआयआरमध्ये सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब हुंडाबळी छळाच्या दाव्याला समर्थन देत नाहीत. हा वाद पती-पत्नीमधील लैंगिक संबंधांबाबत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने असे निरीक्षण केले की प्राथमिक आरोप पती-पत्नीमधील लैंगिक मतभेदांवर केंद्रित आहेत आणि हुंड्याच्या मागणीशी संबंधित नाहीत. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे स्पष्ट आहे की दोन्ही पक्षांमधील वाद हा लैंगिक संबंध प्रस्थापित न करण्याबाबत आहे, त्यामुळे महिलेच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आला आणि हुंड्याच्या मागणीबाबत खोटे आणि बनावट आरोप करण्यात आले.
पती बायकोजवळ यौन इच्छा व्यक्त करणार नाही तर कुठे करणार? : हायकोर्ट
न्यायालयाने प्रश्न विचारला आणि म्हटले की, नैतिकदृष्ट्या सुसंस्कृत समाजात जर पुरुष आपल्या पत्नीकडे आपली लैंगिक इच्छा व्यक्त करत नसेल किंवा पत्नीने तिच्या पतीकडे लैंगिक इच्छा व्यक्त केली नाही तर तो कुठे जाईल? न्यायालयाने म्हटले की, आमच्या दृष्टीने सध्याची एफआयआर ही हुंड्याच्या मागणीबाबत एक बनावट कथा आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, एफआयआरमध्ये केलेले आरोप आणि विरोधी पक्षाचे विधान हे शारीरिक संबंधांबाबतचे आहेत आणि विरोधी पक्षाने (पत्नीने) केलेल्या वक्तव्यात मारहाणीचे आरोप याचिकाकर्त्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण न करण्याच्या संबंधात आहेत आणि हुंडा मागण्यासाठी नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.