राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार; लिलावतीत उपचारांसाठी नेण्यापूर्वीच मृत्यू!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे.
शनिवारी रात्री ९ वाजता तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे. पण अद्याप हे तरुण कोण होते हे कळू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे पुत्र झिशान हे आमदार आहेत.
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी निर्मल नगर इथं एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली, त्याआडून हा गोळीबार झाला आहे. त्यांना तीन गेळ्या लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही कळतंय. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.