Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा, सांगलीतून पृथ्वीराज (बाबा ) पाटील

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा, सांगलीतून पृथ्वीराज (बाबा ) पाटील 
 

मुंबई : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. या तिसऱ्या यादीत मुंबईतील मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत सचिन सावंत यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसने शनिवारी तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ८७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईसह राज्यातील विविध १६ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे यांनाही दिग्रसमधून संधी मिळाली आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी मिळाली आहे.

 
काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज शनिवारी काँग्रेसने १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत एकूण ८७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तिसऱ्या यादीनंतर चौथ्या यादीत कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय नेत्यांसहित सर्वांचं लक्ष असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.