राज्य सरकारने राज्यातील तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची ४० हजार कोटींची बिले थकवली आहेत.
सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्यपालांना काळी पणती आणि काळा आकाश कंदील दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी ही माहिती दिली. मिलिंद भोसले म्हणाले की, राज्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. मात्र त्यांचा मोबदला देण्यास सरकारने टाळाटाळ सुरू केली आहे. आपली हक्काची सुमारे ४० हजार कोटींची बिले मिळावी या मागणीसाठी आतापर्यंत विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली. तरीही सरकारने त्याकडे कानाडोळा केला आहे. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवरही सरकार ही थकित देयके देण्याबाबत सकारात्मकता दाखवित नाही. त्यामुळेच आता कंत्राटदारांच्या संघटनेने दिवाळी सणाचे पावित्र्य राखत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना काळी पणती, त्यात तेलाऐवजी पाणी आणि काळा आकाशकंदील भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.