Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांनी घेतलेआरेवाडी येथे श्री बिरोबा देवाचे दर्शन; देवस्थान समितीतर्फे सत्कार

आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांनी घेतले आरेवाडी येथे श्री बिरोबा देवाचे दर्शन; देवस्थान समितीतर्फे सत्कार
 
 
सांगली, दि.३०: सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार  आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी बुधवारी श्री क्षेत्र आरेवाडी येथे जाऊन श्री बिरोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टतर्फे सुधीरदादांचा काठी, घोंगडे, फेटा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. 

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच श्री बिरोबा देवाचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार ते आज आरेवाडी येथे गेले. तेथे त्यांनी देवाचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा काठी, घोंगडे, फेटा देऊन आणि भंडारा लावून भावपूर्ण असा सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्यांचा तालवाद्यांचा गजर सुरू होता.
 
सुधीरदादा गाडगीळ विनम्र भावनेने म्हणाले,आज मला श्री बिरोबा देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. निवडणूक संपली की मी या देवस्थानचा आणखी विकास कसा करता येईल या संदर्भात राज्य सरकारसमोर प्रस्ताव ठेवीन. त्यावेळी मला त्या संदर्भात सर्व तपशील द्यावा.

सुधीरदादा गाडगीळ यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी,विष्णू माने,संजय यमगर,सविता मदने,कल्पना कोळेकर,रघुनाथ सरगर, भारत खांडेकर,ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनील वाघमोडे ,दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे,अमित गडदे,संतोष रूपनर,श्रीकांत शिंदे,आनंदा म्हारूगडे,भूपाल सरगर,शुभम कोळेकर,विनायक कोळेकर,बामनोलीचे उपसरपंच विष्णू लवटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सरगर,भीमराव रूपनर,सुमित यमगर बामनोलीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
शेंडगेबापूंच्या समाधीचे दर्शन

माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीरावबापू शेंडगे यांच्या केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील समाधीचे दर्शनही आमदार गाडगीळ यांनी घेतले. स्वर्गीय शेंडगे यांनी अनेक वर्षे सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. एक अत्यंत कार्यक्षम, प्रामाणिक , कष्टाळू आणि सज्जन नेते अशी त्यांची प्रतिमा होती.

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी बुधवारी आरेवाडी येथे श्री बिरोबा देवाचे दर्शन घेतले. त्यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा काठी, घोंगडे,फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.