Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई 


सांगली:- पलूस तालुक्यातील पलूस-बांबवडे रस्त्यावरील बांबवडे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

विशाल माणिक धेंडे (वय २७, रा. धुळगाव, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. त्याप्रमाणे पथक शस्त्रे बाळगणारे, विक्री करणाऱ्यांचा शोध घेत होते. त्यावेळी बांबवडे फाटा येथे एकजण देशी पिस्तूल घेऊन एकज थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने पलूस येथील बांबवडे फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी धेंडे तेथे संशयास्पदरित्या असताना थांबल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस सापडले. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे पिस्तूल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्दशर्नाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, संदीप गुरव, सतीश माने, संदीप नलवडे, विक्रम खोत, अभिजित ठाणेकर, गणेश शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.