Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ शिंदेनी 'या' आमदाराला संधी देत विधानसभेचा पहिला उमेदवार केला जाहीर

एकनाथ शिंदेनी 'या' आमदाराला संधी देत विधानसभेचा पहिला उमेदवार केला जाहीर


रामटेक : राज्यातील विधानसभेच्या निवडणूका अवघ्या एक महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एका बाजूला महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप जाहीर झाला नाही तर दुसरीकडे काही नेत्यांची उमेदवारी जाहीर केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

‘या’ ठिकाणी केला उमेदवार जाहीर
रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जयस्वाल यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा लढवण्यासाठी भाजप इच्छुक होते. मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेनी उमेदवार घोषित केल्याने भाजपच्या इच्छुकांना धक्का बसला बसला आहे.

आशिष जयस्वाल हे 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यात आशिष जयस्वाल यांचाही समावेश आहे. आशिष जयस्वाल यांनी गुवाहाटी गाठत शिंदे यांना साथ दिली होती. आशिष जयस्वाल यांना महायुतीची उमेदवारी देण्यात येऊ नये अशी स्थानिक भाजप नेत्यांची मागणी होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.