Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत कमळच! मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार ठरला? नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा

मिरजेत कमळच! मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार ठरला? नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा

सांगली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सत्ताधारीसह विरोधी पक्ष उमेदवारांची नावे निश्चित करण्यात गुंतले आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.


महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात जागावाटपाची चर्चा अध्याप सुरुच आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात नेत्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे.

मिरज मतदारसंघाचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोशल मीडिया फोसबुकवर “मिरजेत कमळच!” अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे येथून त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याचे संकेत मिळत आहेत. खाडे यांना यावेळी उमेदवारी मिळाल्यास त्यांना सलग पाचव्यांदा उमेदवारी मिळणार आहे.

दरम्यान, भाजपची पहिली यादी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरेश खाडे यांनी उमेदवारी एक प्रकारे जाहीर केली आहे का अशीही चर्चा आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक न्याय मंत्री होते.

मिरज विधानसभेची 2019 ची निवडणुक –

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिरजमध्ये सुरेश खाडे 96 हजार 369 मते मिळवून विजयी झाले होते. येथे समाजवादी कामगार पक्षाचे बाळासो दत्तात्रय हनमोरे हे 65971 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. तर वंचित बहुजन आघाडीचे नानासो सदाशीव वाघमारे हे 8902 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, 2014च्या निवडणुकीत देखील 93 हजार 795 मते मिळवून खाडे विजयी झाले होते.

सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल –

दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे व भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर शिंदेसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचा एक असे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल आहे. ठाकरे सेनेचा सांगली जिल्ह्यात एकही आमदार नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.