महाराष्ट्र हादरला.! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह जंगलात पुरला; विवाहित जवानाचे भयंकर कृत्य
नागपूर : नागपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने एका तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा गळा आवळून खून करून मृतदेह जंगलात पुरल्याची घटना घडली आहे.
ज्योत्सना आकरे (वय-३२) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. अजय वानखेडे (वय-३३, न्यू कैलासनगर) असे आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
ज्योत्सना ही टेलिकॉलर म्हणून नोकरी करत होती. तिचा घटस्फोट झाला होता व दुसऱ्या लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यातूनच ज्योत्सनाची आरोपी अजयसोबत ओळख झाली होती. अजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याने १९ मे मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. ही बाब त्याने ज्योत्सनापासून लपवून ठेवली होती.दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी ज्योत्सना बेसा येथे तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी फोन लावून मैत्रिणीला विचारणा केली. त्यावेळी ज्योत्सना रात्री आठ वाजता फोनवर बोलण्यासाठी बगिच्यात गेली व तेथून परत आलीच नाही, असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. तिच्या नातेवाईकांनी १७ सप्टेंबरपर्यंत तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ती न सापडल्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
असा झाला खुनाचा उलगडा
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलमुळे सुगावा लागला. तिचा मोबाईल आरोपीने हैदराबादला गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. तो ट्रक काही दिवसांनी नागपुरात परत आला व ट्रकचालकाला त्यात मोबाईल दिसला. त्याने त्यातील सीम काढून वेगळे सीम टाकले. तेव्हा पोलिसांना मोबाईल फोन ट्रेस झाला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितलं.
खुन करून तरुणीचे कपडे काढून पुरला मृतदेह
आरोपी अजयने ज्योत्सनाला कारमध्ये बसवून वारंगा येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तिचे पूर्ण कपडे काढून तिचा मृतदेह मेणकापड व प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. तेथे त्याने सिमेंटने फ्लोअरिंगदेखील केले. यानंतर तिचे कपडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. तरुणीचा मोबाईल फोन सापडल्यावर पोलिसांना ती गायब होण्याच्या वेळी अजयसोबत बोलत असल्याचे लक्षात आले. त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याने तिचा मृतदेह पुरलेली जागा दाखविली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.