महिला कर्ज मुक्ती अभियान संपन्न
सक्तीची कर्ज वसुली विरोधात महिला आयोगाकडे सामूहिक तक्रार दाखल करणार : सौ.विजयालक्ष्मी कदम ( प्रदेशाध्यक्ष - कर्जमुक्ती अभियान )
सांगली - विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गट व समूह गटांच्या नावाखाली महिलांचे आर्थिक उन्नतीच्या नावाखाली शोषणाची साखळी निर्माण केली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने सक्तीने कर्ज वसुली करत असल्यामुळे अनेक सर्वसामान्य महिलांचे आर्थिक मानसिक शोषण होत असल्याने अध्यक्षस्थानी असणारे माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख यांनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केले. तर महिलांवरील अन्यायाचा विरोधात राज्य महिला आयोगाकडे सामूहिक तक्रार दाखल मोहीम राबविणार असल्याचे महिला कर्जमुक्ती अभियानाचे प्रदेशाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी कदम यांनी सांगितले.
इनाम धामणी (ता.मिरज ) येथील कर्जमुक्ती अभियानाच्या बैठकीच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी कदम होत्या. विधानसभेतील भावी उमेदवारांना कर्ज वसुलीच्या चुकीच्या बेकायदेशीर पद्धतीच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी. अन्यथा बचत गटातील महिला कर्जदारांनी मतदान करताना विचार करावे, किंवा निवडणूक लढवणारे कोणीच उमेदवार पसंत नाही च्या ( नोटाच्या) समोरील बटन दाबण्याचा भविष्यात विचार करू.
यावेळी अभियानाच्या बैठकीमध्ये महिला कर्जमुक्ती अभियानाच्या मनीषा माळी, सारिका कुलकर्णी, भाग्यश्री कदम, पद्मिनी पुजारी, स्वप्नाली कोळी, आशा पाटील, दिपाली माळी, रूपाली कोळी, अपर्णा कोळी,ऍड. त्रिशला पाटील यांच्यासह शुभांगी कोळी, भारती बनणे, शीलप्रभा पाटील, शोभा कोळी, पूजा कोळी आदी महीला उपस्थित होते. या प्रसंगी आभार वसंत भोसले तर प्रस्तावना प्रमोद माळी यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.